Aadhaar e-KYC च्या माध्यमातून घरबसल्या उघडू शकता NPS account, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑनलाइन आधार ई-केवायसीचा वापर करून नॅशनल पेंशन सिस्टम (एनपीएस)(NPS) अकाऊंट उघडणे खुप सोपे आहे. एनएसडीएल-सीआरएने आपल्या ई-एनपीएस(NPS) प्लॅटफॉर्मवर ग्राहक नोंदणीसाठी आधार बेस्ड ऑनलाइन ई-केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया सक्षम केली आहे. ई-एनपीएस पीएफआरडीएद्वारे नियुक्त सेंट्रल रेकॉर्ड किपिंग एजन्सीज (सीआरए) चा एक ऑनलाइन एनपीएस ऑन-बोर्डिंग प्लॅटफॉर्म आहे. येथे कुणीही एनपीएसमध्ये नोंदणी करू शकते. सोबतच येथे ऑनलाइन योगदान सुद्धा जमा करता येते.
या प्लॅटफॉर्मवर सध्याचे सबस्क्रायबर आपले टियर-2 खाते अॅक्टिवेट करू शकतात. यापूर्वी ई-एनपीएस अंतर्गत नोंदणी आधार ऑफलाइन ई-केवाईसी किंवा व्यक्तीचे पॅन आणि बँक खात्याद्वारे होत होते. परंतु आता आधार बेस्ड ऑनलाइन ई-केवायसी प्रमाणीकरण प्रक्रियेने एनपीएस खाते उघडण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. जाणून घेवूयात पूर्ण प्रोसेस…
WTC Final : ‘या’ प्रकारची आहे भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची ‘जर्सी’
ही आहे प्रोसेस
स्टेप 1. ई-एनपीएस पोर्टल (https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html) वर जा.
स्टेप 2. आता National Pension System आणि यानंतर Registration पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 3. आता New Registration मध्ये खात्याचा प्रकार निवडा. नंतर भारतीय नागरिक, एआरआय किंवा ओसीआयपैकी एक पर्याय निवडा.
स्टेप 4. आता Register With पैकी Aadhaar Online/Offline KYC पर्यायाची निवड करा. आता यानंतर Tier types पैकी Tier I only पर्यायाची निवड करा.
स्टेप 5. आता 12 अंकाचा आधार किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी नोंदवा आणि नंतर जनरेट ओटीपीवर क्लिक करा.
स्टेप 6. आता प्राप्त झालेला ओटीपी नोंदवा.
स्टेप 7. यशस्वी पडताळणीनंतर तुमची माहिती जसे की, नाव, लिंग, जन्म तारीख, पत्ता, फोटो, आधारकार्ड रेकॉर्डमधून घेतले जाईल.
स्टेप 8. आता एनपीएस नोंदणी प्रोसेससाठी दुसरी मागितलेली माहिती नोंदवा.
स्टेप 9. आता पहिले एनपीएस योगदान द्यावे लागेल आणि ओटीपी नोंदवावा लागेल. यासोबतच तुमचे एनपीएस खाते उघडले जाईल.
RBI नं ‘या’ मोठया बँकेला ठोठावला तब्बल 10 कोटींचा दंड, जाणून घ्या कारण
Video : IPL 2021 साठी UAE ला जाण्यासाठी तयार Chahal ची पत्नी Dhanashree, डान्स व्हिडिओ वायरल