SBI मध्ये PPF अकाऊंट काढून मिळवा जास्त व्याजदर, जाणून घ्या ऑनलाइन प्रक्रिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पब्लिक प्राॅव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ हा भारत सरकारचा स्मॉल सेव्हिंग फंड आहे. याचे व्याज दर केंद्र सरकारकडून तीन महिन्यातून एकदा निश्चित केले जातात. सध्या यावर 7.9 टक्के वार्षिक व्याज मिळते. पीपीएफ खात्यात किमान 500 रुपये जमा केले जाऊ शकतात. तर वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. पीएफ खात्यावर जमा रक्कमेवर आयकर आकारला जात नाही. हे खाते पोस्ट ऑफिसमध्ये देखील सुरु केले जाऊ शकते. काही बँका म्हणजेच भारतीय स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेत देखील तुम्ही पीपीएफ खाते सुरु करु शकता. तुम्ही हे खाते बँकेत जाऊन किंवा ऑनलाइन देखील सुरु करु शकता. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने देखील पीपीएफ खाते एसबीआय बँकेत सुरु करु शकता.
कसे सुरु करु शकता ऑनलाइन SBI PPF –
1) एसबीआय ऑनलाइन खाते लॉन इन करा, त्या सूचनेवर क्लिक करा.
2) मेन्यूमध्ये जाऊन तुम्हाला पीपीएफ खात्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला त्या खात्यासंबंधित माहिती मिळेल. जर तुम्ही अल्पवयीन पाल्यासाठी खाते सुरु करु इच्छित असाल तर अल्पवयीन खातेधाराकांसाठी खाते सुरु करण्यासाठीच्या पर्यायावर क्लिक करा.
3) आता तुम्हाला अल्पवयीन पाल्या संबंधित माहिती भरावी लागेल. जसे की नाव, वय त्याच्या बरोबरचे नाते इत्यादी.
4) जर तुम्ही तुमचे पीपीएफ खाते सुरु करु इच्छित असाल तर तुम्हाला ब्रॅंच कोडमध्ये नॉमिनीचे नाव टाकावे लागेल. यात तुम्ही जास्तीत जास्त 5 नॉमिनी लावू शकतात.
5) त्यानंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करावे लागेल. यात रेफरेंस नंबर देखील तुम्हाला टाकावा लागेल.
6) आता तुम्हाला रेफरेंस संख्येसह फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.
7) आता तुम्हाला डाऊनलोड केलेला फॉर्म केवायसी कागदपत्रांसह प्रिंट काढून भरावा लागेल, हा फॉर्म तुम्हाला 30 दिवसाच्या आत बँकेच्या शाखेत जमा करावा लागेल.
पीपीएफ खात्याचा कालावधी –
पीपीएफ खात्याचा कालावधी मुख्य रुपात 15 वर्षाचा असतो. यानंतर देखील तुम्ही कालावधी वाढवू इच्छित असाल तर तसा अर्ज करुन 5 वर्षाच्या एक किंवा अधिक ब्लॉक्ससाठी योजनेचा कालावधी वाढवू शकता.
वेळेआधी पैसे काढले तर –
या योजनेच्या काही अटींनुसार तुम्हाला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करावा लागेल, यानंतर तुम्हाला खात्यातून अगाऊ रक्कम काढण्याची परवानगी मिळेल. ही सुविधा अल्पवयीन खात्यावर देखील लागू असेल.
खात्याचे ट्रांसफर –
जर एखादा व्यक्ती आपले खाते ट्रांसफर करु इच्छित असेल तर त्यांना SBI च्या दुसऱ्या एखाद्या शाखेत आणि पोस्ट ऑफिसमध्ये ट्रांसफर करता येईल.
Visit : Policenama.com
- ‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा
- ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर
- केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग रोज ‘हे’ आवश्य खा
- घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत
- प्रथमच प्रणायाचा आंनद घेताय ? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी
- घसा दुखतोय ? मग करा ‘हे’ खास घरगुती उपाय, ताबडतोब मिळेल आराम
- फॅशन करा पण, आरोग्यावर परिणाम होणार याची काळजी घ्या, ‘हे’ आहेत परिणाम