फायद्याची गोष्ट ! दिवाळीची शॉपिंग करताना ‘या’ 4 सोप्या पध्दतीचा वापर करा अन् पैसे वाचवा, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – तुम्ही दिवाळीत ऑनलाइन, ऑफलाइन खरेदी करणार असाल तर तुम्ही पैसे देखील वाचवू शकतात. ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदीच्या माध्यमातून ग्राहक कॅशबॅक आणि डिस्काउंट मिळवू शकतात. सणासुदीला खरेदी शुभ मानली जाते. शॉपिंग करताना तुम्हाला ऑनलाइन, ऑफलाइनवर अनेक ऑफर, डिस्काउंटचे पर्याय उपलब्ध आहेत. परंतू त्यातील एका निवडणं तसं अवघड असते. या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही बँकेतून पेमेंटवर सूट, क्रेडिट कार्ड रिवार्ड पॉइट, कॅशबॅक, कूपन कोड सारखे पर्याय मिळवू शकतात.

1. वेबसाइटवर मिळणारी सूट –
जेव्हा तुम्ही फेस्टिवलच्या दरम्यान शॉपिंग करतात तेव्हा इतर वेबसाइट किती सूट देतात हे नक्की पाहा. किंमतीची तुलना करुन तुम्ही चांगले डिस्काउंट मिळवू शकतात किंवा कॅशबॅक मिळवू शकतात.

2. कॅशबॅक ऑफर –
अनेक रिटेलर्स विविध बँकांच्या कार्डवर आणि डिजिटल वॉलेटवर कॅशबॅकची ऑफर देतात. डिस्काउंट शिवाय, कॅशबॅक ऑनलाइन शॉपिंगच्या दरम्यान पैसे वाचवण्याची चांगली पद्धत आहे. अनेक वेबसाइट कॅशबॅकची ऑफर देतात. तुम्ही ऑनलाइन रिटेलरवर खरेदी करतात तेव्हा रिटेलर तुम्हाला विक्री करण्यासाठी कमीशन देतात. हे कमीशन तुम्ही नंतर कॅशबॅकच्या स्वरुपात पाठवू शकतात.

3. कार्टमध्ये वस्तू सिलेक्ट करुन ठेवणे –
तुम्ही जर एक्सक्लूसिव आणि कस्टमाइज ऑफरसाठी ही ट्रीक वापरु शकतात. तुम्ही जेव्हा तुमच्या कार्टमध्ये वस्तू सिलेक्ट करुन ठेवतात आणि चेक आऊट करत नाहीत आणि बऱ्याच काळापासून वस्तू कार्टमध्ये पडून असते तेव्हा ई टेलर तुमच्या कार्टमधील वस्तूंच्या किंमती कमी करतात आणि तुम्हाला विशेष सूट मिळते.

4. बँक, वॉलेट ऑफर आणि कूपन –
अनेक बँका आणि डिजिटल वॉलेट कंपन्या विशेष सूट देण्यासाठी कॅशबॅक, सूट आणि 0 टक्के ईएमआय ऑफर देण्यासाठी ऑनलाइन विक्रेत्यांबरोबर टायअप करतात. तुम्ही या डीलची तुलना सहज करु शकतात आणि खरेदीवर सूट मिळवू शकतात. तुम्ही तुमच्या मित्रांचे, घरातील सदस्यांसाठी देखील कार्ड करु शकतात. ऑनलाइन शॉपिंग करताना पैसे वाचवण्यासाठी कूपन देखील मिळते.

Visit : Policenama.com