कामाची गोष्ट ! चांगल्या बचतीसाठी तुमच्या कामाच्या आहेत ‘या’ 5 गोष्टी, आवश्य विचार करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येकाला आपण श्रीमंत व्हावे असे वाटत असते. आपल्याकडे भरपूर पैसे असावेत, जगातील सर्व सुखांचा आस्वाद आपल्याला घेता यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु यासाठी लहान लहान गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्या तुम्हाला श्रीमंत होण्यास मदत करतील. फायनान्सियल प्लॅनर यांचे म्हणणे आहे की, श्रीमंत होण्यासाठी नियोजित मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत. यामध्ये गुंतवणूकीकडे देखील लक्ष दिले पाहिजे. फक्त गुंतवणूक करून चालणार नाही तर, काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत त्या तुमच्या फायद्याच्या ठरतील.

बजेट तयार करा
सगळ्यात आधी तुम्ही तुमचे बजेट तयार करा. आपली कमाई किती आणि खर्च किती हे पहा. मग त्यानुसार गुंतवणुकीचा विचार करा. पैसे वाचवण्यासाठी प्रयत्न करताना पहिल्यांदा प्रत्यक्षात आपल्याकडे किती पैसे आहेत आणि ते पैसे कुठे खर्च होतात याचे मुल्यांकन करा.

लक्ष्य निश्चित करा
कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी अगोदर आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. जर तुम्ही व्यवसाय किंवा नोकरी करत असाल तर हे आपल्यासाठी लागू होते. एकदा का आपण आपले ध्येय निश्चित केले की ते ध्येय साध्य करण्यासाठी आपले लक्ष त्यावर केंद्रीत करा. हे आपल्याला उत्पन्नाच्या बाबत सुरक्षित वाटू लागेल.

शक्यतो कर्ज घेणे टाळा
मासिक कर्ज भरणे ही पैशांची बचत करण्याचा सर्वात मोठा अडथळा आहे. कर्जामुळे गुंतवणुकीसाठी आपल्याकडे काहीच शिल्लक रहात नाही. यासाठी कमीत कमी कर्ज घेण्याचा प्रयत्न करा.

काळाचे महत्त्व समजून घ्या
इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ‘टाईम अँड टाईम वेट फॉर नॉन’. मग आपल्याला वेळेचे महत्त्व देखील समजून घ्यावे लागेल. ज्ञान प्रत्येक परिस्थितीत आपली मदत करत असते म्हणून प्रत्येकाने चांगल्या गोष्टींची माहिती आत्मसात केली पाहिजे. आपण वेळेचा चांगला वापर केल्यास आपण लवकरच आपल्या निश्चित केलेल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करू शकता.

मिळकतीसाठी योग्य गुंतवणूक
जास्त पैसे मिळवण्यासाठी जास्तीत जास्त पर्यांयांचा शोध घ्या. परंतु याचा अर्थ असा नाही की, आपण चुकीच्या मार्गाने पैसे मिळवले पाहिजेत. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्ही तुमची ताकद अशा ठिकाणी लावा ज्या ठिकाणी जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच बचतीमध्ये गुंतवणूक करण्याची सवय देखील आपल्याला लावून घ्या. पैसे मिळवण्याचा योग्य मार्ग निवडा. लक्षात ठेवा थेंबे थेंबे तळे साचते तसे थोड्या थोड्या बचतीने मोठी गुंतवणूक होते.