LIC नं लॉन्च केली नवीन योजना, बचतीसह मिळणार सुरक्षा, जाणून घ्या खास गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतीय जीवन विमा महामंडळ ( LIC) एक नवीन योजना घेऊन आला आहे. बीमा ज्योती योजना असे त्याचे नाव आहे. ही एक नॉन – असोसिएटेड, नॉन- पार्टसिपेशन, वैयक्तिक बचत योजना आहे. ही योजना एकाच वेळी बचत आणि सुरक्षा दोन्ही ऑफर करते. तसेच या योजनेवर मॅच्युरिटीच्या वेळी एकरकमी देय मिळेल. त्याच वेळी, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना आर्थिक सहाय्य देखील प्रदान केले जाईल. ही योजना एलआयसी एजंटद्वारे किंवा एलआयसी वेबसाइटला भेट देऊन ऑफलाइन खरेदी देखील केली जाऊ शकते.

या योजनेत, प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या अखेरीस, विमाधारकाच्या मूलभूत रकमेवर दर हजार रुपयांवर अतिरिक्त 50 रुपये जोडले जातील. जोखीम सुरू होण्याच्या तारखेनंतर पॉलिसीच्या कालावधीत मृत्यू झाल्यास, ‘मृत्यूची विमा राशी’ आणि पॉलिसीच्या अटींनुसार जमा केलेली गॅरंटीड अतिरिक्त रक्कम देय असेल. एलआयसीने प्रसिद्धीपत्रक जारी करत म्हंटले कि, या योजनेंतर्गत किमान मूलभूत निश्चित रक्कम एक लाख रुपये असेल. त्याच वेळी, कोणतीही जास्तीत जास्त मर्यादा नाही. ग्राहक ही पॉलिसी 15 ते 20 वर्षासाठी घेऊ शकतात. पॉलिसीच्या मुदतीतून पाच वर्ष वजा करुन प्रीमियम भरण्याच्या कालावधीची गणना केली जाईल. बिमा ज्योती पॉलिसी 90 दिवसाच्या मुलापासून ते 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक घेऊ शकतात.

या योजनेत हप्त्यांमध्ये डेथ / मॅच्युरिटी बेनिफिट्स घेण्याचा पर्यायदेखील देण्यात आला आहे, ज्यात अनेक अटी आहेत. प्रीमियम वार्षिक आधारावर, सहामाही आधारावर, तिमाही आधारावर किंवा मासिक अंतराने भरता येतो. रोख रकमेची गरज भागविण्यासाठी कर्जाची सुविधा देखील या पॉलिसीमध्ये उपलब्ध आहे.