खुशखबर ! राष्ट्रीय पेन्शन योजनेवर (NPS) सरकार देणार जास्तीचे पैसे, मॅच्युरिटीवर टॅक्स देखील नाही, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने अर्थ संकल्प मांडल्यानंतर राष्ट्रीय पेंशन प्रणाली मध्ये केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना १४ टक्के योगदान देणार आहे. जे आधी १० टक्के होते. याबरोबरच ६० वर्षांनंतर मॅच्युरिटी झाल्यानंतर टीअर २ अकाऊंटमधून आयकर अधिनियमच्या कलम ८० सी च्या अंतर्गत रक्कम काढल्यास करावर सूट मिळणार आहे. हे २०२०-२१ च्या दरम्यान लागू होईल.

NPS मधील बदलांचा समावेश अर्थ संकल्पात करण्यात आला होता. परंतू याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे आणि अधिसूचना देखील आधीच लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना १० टक्के योगदान देते होते, मात्र आताच्या वित्त वर्षाच्या सुरुवातीला सरकार १४ टक्के योगदान देणार आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक विशेष लाभ १ एप्रिल २०२० पासून लागू होईल. टिअर २ एनपीएस अकाऊंटमध्ये योगदान आयकर आधिनियम कलम ८० सी साठी पात्र असेल. परंतू जमा करण्यात आली रक्कम तीन वर्ष पुर्ण होईल पर्यंत काढता येणार नाही. २०२०-२१ वर्षात सुरु होणाऱ्या या एनपीएस ग्राहकांसाठी सर्वात महत्वपूर्ण बदल हे आहे की ६० वर्षांच्या वयात रिटायरमेंटदरम्यान काढण्यात येणारा पैसा करमुक्त असेल.

६० टक्के रक्कम करमुक्त
रिटायरमेंट अनुसार ६० वर्षांनी रिटायर झाल्यानंतर ६० टक्के एनपीएस कॉर्पस एक ग्राहक पुन्हा काढू शकतो. तो त्यातील ४० टक्के रक्कम पेेंशन पॉलिसीमध्ये गुंतवणूक म्हणून ठेवू शकतो. जे IRDAI सारखे रेगुलेटिड इंशुरन्स कंपनी सारखे असेल. सुरुवातीला ग्राहकांनी पेंशन पॉलिसीमध्ये आधिक गुंतवणूक करण्यास प्रोस्ताहित करण्यासाठी पुर्ण रक्कमेला करयुक्त बनवण्यात आले होते. त्यानंतर ६० टक्के रक्कमेतील ४० टक्के रक्कमेला कर मुक्त करण्यात आले होते आणि २० टक्के रक्कमेला करयुक्त ठेवण्यात आले होते. परंतू आता १ एप्रिल २०२० पासून ६० टक्के रक्कम पुर्णता कर मुक्त करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक बातम्या

वजनावर ठेवायचे आहे नियंत्रण, तर चुकूनही करू नका ‘या’ ८ चुका

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई