Post Office Saving Scheme : खुपच चांगले ‘रिटर्न’ मिळतायेत पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून, जाणून घ्या खास काय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या लहान बचत योजना देते. या योजना चांगल्या व्याज दर आणि सुरक्षित गुंतवणूकीसाठी परिचित आहेत. पोस्ट ऑफिस सेविंग स्कीम अशीच एक योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करून गुंतवणूकदार लक्षणीय बचत करू शकतात आणि त्याच्या बचतीत अधिक व्याज मिळवू शकतात. पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीममध्ये पालक, एकल प्रौढ, संयुक्त खाते (जास्तीत जास्त दोन प्रौढ), दहा वर्षांपेक्षा कमी वयाचे आणि मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्तीच्या नावे खाते उघडू शकतात. जाणून घेऊया या योजनेच्या विविध पैलूंबद्दल…

व्याज दर
पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीममधील व्याज दराबद्दल बोलायचे झाल्यास या योजनेअंतर्गत, एकल किंवा संयुक्त खात्यात वर्षाकासाठी 4 टक्के दराने व्याज मिळते. यासह, आर्थिक वर्षात 10,000 रुपयांपर्यंतचे व्याज उत्पन्न देखील करमुक्त आहे.

ठेव मर्यादा
पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीममधील ठेवींच्या मर्यादेविषयी बोलायचे झाल्यास या योजनेंतर्गत किमान 500 रुपये खुल्या खात्यात ठेवणे आवश्यक आहे. पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्यात खातेदार किमान 500 रुपये ठेवण्यास असमर्थ असल्यास प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी मेंटेनन्स फी म्हणून 100 रुपये वजा केले जातात. मेंटेनन्स शुल्क वजा केल्यानंतर खात्यात शून्य शिल्लक राहिल्यास हे खाते बंद आहे.