PPF मध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी जाणून घ्या ‘या’ 7 महत्वाच्या गोष्टी, होईल ‘फायद्याच – फायदा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पब्लिक प्रॉव्हिडंड फंड (पीपीएफ) अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही गुंतवणूकदारांमध्ये सर्वात लोकप्रिय अशी योजना निश्चितच आहे. कारण यामध्ये तुम्हाला निश्चित व्याजदर तसेच परतावा मिळण्याची शाश्वती असल्याने मुलांचे लग्न, शिक्षण आणि मुलीच्या विवाहाप्रसंगी तुम्हाला पैसे जमा करण्यास मदत होते. या योजनेत मिळणारे व्याज हे इतर योजनांच्या तुलनेत अधिक आहे. त्याचबरोबर यावर कोणताही आयकर द्यावा लागत नसल्याने हे सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहे.

या खात्याची मुदत हि 15 वर्षाची असते. तसेच या योजनेतील व्याज तुम्हाला संपूर्ण वर्षभराचे एकत्रित मिळत असते. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.यामध्ये तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही जॉईंट अकाउंट उघडू शकत नाहीत.

1)
पालक आपल्या मुलांच्या नावे हे खाते उघडू शकतात. मात्र जर पाल्याचे आधीपासूनखाते नसेल तर मात्र तो दोन्ही खाते मिळून केवळ दीड लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतो.

2)
जर त्याच्या खात्यामध्ये पालकांनी पैसे जमा केले तर पालक आयकर विभागाच्या 80 क या कलमांतर्गत सूट मिळण्यास पात्र होऊ शकतात.

3)
अल्पवयीन मुलगा १८ वर्षांचा झाल्यानंतर त्याचे खाते तुम्ही प्रौढ खात्यात बदलून घेऊ शकता. यासाठी केवळ त्या मुलाचे हस्ताक्षर करावे लागेल. त्यानंतर तो मुलगा स्वतः आपले खाते सांभाळू शकतो.

4)
अनिवासी भारतीय हे PPF अकाउंट उघडू शकत नाही. मात्र याआधी ज्या NRI ने खाते उघडले होते त्याचे खाते मात्र सुरु राहणार आहे.

5)
प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपासून ते महिन्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंतच्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळते. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला फायदा होईल

6)
या खात्याची मुदत हि साधारणपणे 15 वर्षांची असते. मात्र 7 वर्षांनंतर तुम्ही तुमच्या खात्यातील विशिष्ट रक्कम काढू शकता. त्यामुळे याचा हा देखील मोठा फायदा आहे.

7)
15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील तुम्हाला हे खाते सुरु ठेवायचे असल्यास तुम्हाला यासाठी फॉर्म एच भरून द्यावा लागणार आहे.

Visit : Policenama.com