निवृत्तीचा विचार करतांय तर मग ‘हे’ 5 चांगले पर्याय आहेत गुंतवणूकचे, होईल ‘भरघोस’ कमाई, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन: बऱ्याच जणांना सध्या निवृत्तीच्या नंतरची चिंता लागलेली दिसत आहे. त्यातल्या त्यात कोरोनामुळे आताची अवस्था बिकट झाली आहे. निवृत्तीनंतर प्रत्येक व्यक्तीची कमाई बंद असते त्यामुळे त्यांच्या नियमित व्यवहारावर बरीच बंधने येतात. याची चिंता निवृत्तीजवळ आल्यावर सुरू होते. रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल काय करता येईल अथवा कशा पद्धतीने नियोजन करता येईल त्याबद्दल हे आर्टिकल वाचा. आपण सध्याच्या घडीला कोणत्या योजनेत पैसे गुंतवून निवृत्ती नंतर आर्थिक दृष्ट्या सबळ राहू याबद्दल पाहू:

1) Senior Citizen Savings Scheme (SCSS): ही त्रैमासिक योजना अशा लोकांसाठी आहे ज्यांनी 60 वर्ष पूर्ण केले आहेत अथवा ज्यांनी 55 वर्षांनंतर ऐच्छिक निवृत्ती स्वीकारली आहे. सध्या या योजनेंतर्गत 7.4 व्याज दिलं जात आहे. याचा कार्यकाल 5 वर्ष असून याची मॅच्युरिटी 3 वर्षापर्यंत वाढवता येते.

Public Provident Fund ( PPF ): हा एक प्रसिद्ध गुंतवणूक पर्याय आहे, जिथं तुम्ही तुमची रिटायरमेंट बचत गुंतवू शकता. ही एक सरकारची 15 वर्षांची योजना आहे. 15 वर्ष पूर्ण झाल्यावर याला 5 वर्षांची मॅच्युरिटी देखील आहे. PPF वरील व्याज प्रत्येक तीन महिन्याला सरकार ठरवत असते.

Government Bonds: हा पर्याय जे लवकर निवृत्त होणार आहेत त्यांच्यासाठी चांगला आहे. यामध्ये तुम्ही आरबीआई बांड, पीएसयू बांड सारख्या आरईसी, आईआरएफसी, पीएफसी, सरकारी-समर्थित बॉन्ड मध्ये पैसे गुंतवू शकता. साध्यस्थितीत या पर्यायात 7% चा प्री-टैक्स रिटर्न मिळतो.

Post Office Time Deposits: हा पर्याय फिक्स्ड डिपॉजिटच्या तुलनेत अधिक व्याज देते. ही सरकारची समर्थन असणारी छोटी जमा योजना आहे. यासाठी 1 ते 5 वर्षामधील काळ ठरवू शकता. यावरील व्याज सरकार तीन महिन्याने ठरवते.