SBI FD Interest Rate : आता वर्ष अखेरपर्यंत घेऊ शकता ‘या’ जास्त व्याजदराच्या स्कीमचा लाभ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने सीनियर सिटीझन्ससाठी स्पेशल एफडी स्कीम (एसबीआय वुईकेयर) ला प्रोत्साहन दिले आहे. बँकेने घसरणार्‍या व्याजदरांच्या दरम्यान सीनियर सिटीझन्सला उच्च व्याजदर प्रदान करणारी ही योजना लाँच केली होती. त्यावेळी बँकेने म्हटले होते की, ही योजना 30 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध राहील, परंतु आता तिचा विस्तार करण्यात आला आहे. आता ही योजना वर्षअखेरपर्यंत सुरू राहणार आहे. या योजनेचे कोणकोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

या स्कीमचे नाव एसबीआय वुईकेयर डिपॉजिट आहे. यामध्ये सीनियर सिटीझन्सला एफडीवर 0.30 टक्के जास्त व्याज मिळते. या योजनेचा लाभ घेऊन सीनियर सिटीझन्स आपल्या एफडीवरर 0.80 (0.50+0.30) टक्के व्याजदर मिळवू शकतात.

हे लोक करू शकता गुंतवणूक
एसबीआय वुई केयरमध्ये 60 वर्ष किंवा यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती गुंतवणूक करू शकतात. योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आहे. कमाल डिपॉझिट रक्कम दोन कोटीपेक्षा कमी आहे. मैच्युरिटीपूर्वी पैसे काढल्यास व्याज मिळत नाही. ही योजना 31 डिसेंबर 2020 पर्यंत खुली आहे.

एसबीआय पाच वर्षाच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 5.40 टक्के व्याजदर देते. जर कुणी सीनियर सिटीझन स्पेशल एफडी योजने अंतर्गत एफडी करत असेल तर त्यास 6.20 टक्के व्याजदर दिला जातो.