खुशखबर ! ‘या’ योजनेत ‘गुंतवणूक’ करा, ‘निवृत्ती’नंतर प्रत्येक महिन्याला ‘भरघोस’ पगार मिळवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवृत्तीनंतर आपल्याला उत्पन्न सुरु रहावे असे अनेकांना वाटत असते त्यासाठी ते विविध योजनामध्ये गुंतवणूक करुन ठेवत असतात. अशीच एक बचत योजना आहे ज्या योजनेचे नाव आहे सीनियर सिटीजन सेविंग्ज स्कीम (SCSS). तुम्ही जर तुमच्या भविष्यासाठी विचार करुन गुंतवणूक करु इच्छित असाल तर तुम्हाला हा एक चांगला पर्याय आहे. या योजनेत एक तिमाही आधारावर एक निश्चित व्याज दरावर व्याज देण्यात येते. बँकेच्या FD पेक्षा ही योजना उत्तम मानली जाते.

८.७ टक्के व्याजदर
सध्या या योजनेचा व्याजदर ८.७ टक्के आहे. सरकार दर तीन महिन्याचे व्याजदर ठरवते. याशिवाय सिस्टेमॅटिक विड्राॅल प्लॅनचा (SWP) पर्यांय देखील चांगला मानला जातो. नियमित पद्धतीने एक निश्चित रक्कम शॉर्ट ड्युरेशन डेट म्यूचअल फंडात गुंतवून तुम्ही सुुरुवात करु शकतात. सिस्टेमॅटिक विड्राॅल प्लॅन एक अशी सुविधा आहे, यामाध्यमातून गुंतवणूकदार एक निश्चित रक्कम म्यूचुअल फंड स्कीममधून परत मिळवू शकतात. यात तुम्ही ठरवू शकतात की तुम्हाला कधी किती पैसे काढायचे आहे.

हे गुंतवणूकदार महिन्याला किंवा तिमाहीच्या आधारे करु शकतात. तसे यात मंथली पर्याय सर्वात आधिक पसंत करतात. हे ग्राहकाने ठरवायचे असेत की त्याला दरमहा पैसे काढायचे आहे की नाही. यात फक्त याची काळजी घ्यावी लागेल की योजनेमधून काढण्यात येणारी रक्कम ठरवून देणाऱ्या रक्कमेपेक्षा जास्त नको, कारण त्याचा परिणाम मिळणाऱ्या परताव्यावर होतो.

आरोग्यविषयक वृत्त