हमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना सारख्या योजनांना भारतीय नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. याचप्रमाणे भारतीय डाक विभागाने नवीन योजना आणल्या असून जेष्ठ नागरिक आणि लहान मुलींसाठी या योजना फायदेशीर आहेत. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकरातून देखील मोठ्या प्रमाणात सूट मिळू शकते. या योजनांवर डाक विभाग साडेआठ टक्के व्याजदर देत असून याचा सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

१) जेष्ठ नागरिक बचत खाते
या योजनेत ६० वर्ष वयाच्या पुढील कोणताही नागरिक सहभागी होऊ शकतो. या योजनेत तुम्हाला कमीकमी १००० रुपये ठेवावे लागणार आहे. त्याबरोबरच निवृत्तीच्या तीन महिने आधी देखील तुम्ही या योजनेत खाते खोलू शकता. दार तीन महिन्यानंतर या बचतीवर तुम्हाला व्याज मिळेल. मार्च, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यात तुम्हाला यावर व्याज मिळेल. त्याचबरोबर या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त १५ लाख रुपये ठेऊ शकता. या योजनेत जेष्ठ नागरिकांना ८. ७ टक्के व्याजदर मिळणार आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त तुम्ही या योजनेत पाच वर्ष पैसे गुंतवू शकता. जर तुम्ही दाराशी या योजनेत ६ हजार रुपये गुंतवल्यास पाच वर्षांनी तुम्हाला १ लाख ७ हजार रुपये मिळतील. त्यामुळे निवृत्तीनंतर आपला विचार करायचा असल्यास जेष्ठांनी या योजनेत पैसे गुंतवल्यास त्यांना चांगला फायदा मिळेल.

२) सुकन्या समृद्धी योजना
शून्य वर्ष ते १० वर्षापर्यंतच्या मुलीचे तुम्ही यामध्ये खाते उघडू शकता. परंतु एक दाम्पत्य आपल्या दोन मुलींचेच य योजनेत खाते खोलू शकतात. या योजनेत तुम्ही कमीत कमी २५० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकतात. वयाच्या २१ व्या वर्षी हे खाते परिपूर्ण झाल्याचे समजले जाणार आहे. मात्र मुलीच्या वयाच्या १८ व्या वर्षी पालक विशिष्ठ कारणासाठी एकुण रकमेच्या ५० टक्के रक्कम काढू शकतात. मुलगी १० वर्षांची झाल्यानंतर तिला या खात्याविषयी व्यवहार करण्याची परवानगी मिळते.

आरोग्यविषयक वृत्त –