आर्थिकमहत्वाच्या बातम्या

IPPB मोबाईल ऍपच्या माध्यमातून उघडा तुमचे पोस्ट ऑफिस डिजिटल सेव्हिंग अकाउंट; जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ (IPPB) मोबाईल ऍपच्या माध्यमातून डिजिटल बचत खाते उघडण्याची सुविधा देते. पोस्ट ऑफिस खातेधारक IPPB मोबाईल ऍपच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने बेसिक बँकिंग व्यवहार करू शकतात. आता या नव्या सुविधेचा फायदा अनेक खातेधारकांना होणार आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्या व्यक्तीला पैसे जमा करणे, बॅलन्स चेक करणे, पैसे ट्रान्सफर करणे आणि इतर काही बँकेसंबंधी व्यवहार करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जायला लागत होते. मात्र, आता तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD), पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेत पैसे ट्रान्सफर करू शकता.

पण आता तुम्ही IPPB मोबाईल ऍपच्या माध्यमातून खाते उघडू शकता. अशी करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस…

– तुमच्या मोबाईलमध्ये IPPB मोबाईल बँकिंग ऍप डाऊनलोड करावे. त्यानंतर ऍपवर Open Account वर जाऊन क्लिक करावे.

– तुमचा पॅनकार्ड आणि आधारकार्ड नंबर टाकावा.

– पॅनकार्ड नंबर आणि आधारकार्ड नंबर टाकल्यानंतर लिंक्ड मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल. त्यानंतर तो OTP द्यावा.

– त्यानंतर तुम्ही आईचे नाव, शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि नॉमिनी यांसारखी माहिती भरावी.

– ही माहिती दिल्यानंतर सबमिट करावी. त्यानंतर खाते उघडले जाते.

– तसेच इन्स्टंट बँक अकाउंटचा उपयोग ऍपच्या माध्यमातून करता येऊ शकतो.

l

Back to top button