‘सविता भाभी’च्या होर्डिंग्जमुळं पुणेकर गोंधळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खोचक टोमणे मारणाऱ्या गंमतीदार पाट्यांमुळे पुणेकर प्रसिद्ध आहेत. आपल्या खास शैलीत खोचक टोमणे मारणे हे पुणेकरांचे वैशिष्ट्य आहे. पुणेरी पेठांमध्ये खास पुणेरी पाट्या हमखास दिसतात. पुणेकरांच्या या पाट्यामुळे बाहेरून येणारे नागरिक गोंधळून जातात. मात्र, सध्या चौकाचौकात लागलेल्या एका होर्डिंग्जमुळे पुणेकरच गोंधळून गेले आहेत. ‘सविता भाभी…. तू इथंच थांब !!’ असे लिहलेले होर्डिंग्ज सध्या संपूर्ण पुण्यात लागले आहेत. या होर्डिंग्जवर दुसरे काहीही लिहलेले नाही. त्यामुळे पुणेकर चांगलेच गोंधळून गेले आहेत.

savita babhi

पुण्यातील सर्व प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांमध्ये या मोठमोठे होर्डिंग्ज लागले आहेत. या होर्डिंग्जच्या ब्लॉक बॅकग्राऊंडवर पिवळ्या अक्षरात लिहण्यात आले आहे. सकाळीच हे होर्डिंग्ज पुणेकरांच्या नजरेस पडल्याने पुणेकर आचंबित झाले आहेत. म्हात्रे पूल आणि परिसरात हे होर्डिंग्ज लागले असून हे होर्डिंग्ज पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.

पुण्यात लावण्यात आलेल्या या होर्डिंग्ज अर्थ काय याचे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. काहींच्या मते ही नव्या टीव्ही मालिकेचे होर्डिंग असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तर काहींच्या मते ही एखादी वेब सीरीस असावी, हे होर्डिंग एखाद्या आगामी चित्रपटाचे असल्याचे अंदाज पुणेकर लावत आहेत. प्रत्येकजण वेगवेगळा अंदाज लावत असून या होर्डिंग्जचा अंदाज लावण्यासाठी माथापच्ची करत आहेत.