सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर संपन्न

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यामाने ‘समर्थ भारत अभियान व सक्षम युवा समर्थ भारत’ या उपक्रमांर्गत आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर उकसाण ता. मावळ या गावी 17 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीत संपन्न झाले. या शिबीराच्या माध्यमातून गावामध्ये समाज उपयोगी विविध उपक्रम राबविण्यात आले.

या शिबीराच्या समारोप प्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी विद्यार्थीनींना व उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना म्हटले की, विद्यार्थीनींनी उच्च शिक्षण घेऊन ग्रामीण भागाची सेवा करावी. तसेच शिक्षण घेऊन भावी जीवनासाठी शहराला प्राधान्य न देता खेड्यांना प्राधान्य दिल्यास ग्रामीण विकासाला चालना मिळेल. कार्यक्रमाचे अध्यक्ष मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष यादवेंद्र खळदे साहेब होते. पर्यावरण रक्षणासाठी तरुण- तरुणींनी आधिक क्रियाशील झाले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य प्रा. वसंत पवार यांची विशेष उपस्थिती होती. प्रास्ताविकात प्राचार्य डाॕ. एस. डब्ल्यू. मिसाळ यांनी निःस्वार्थी सेवा व समाजशिलता हे गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे मत मांडले.

या कार्यक्रमामध्ये एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी प्रा. योगिता शिंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या या सात दिवशीय शिबीरात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. या कार्यक्रमाला उकसाण गावच्या सरपंच जनाबाई शिंदे, उपसरपंच तानाची शिंदे, पोलिस पाटील सुषमाताई शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक वसंत भोसले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. भागवत देशमुख यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. ज्ञानेश्वर सावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाच्या शिक्षण, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बरोबरच उकसाण गावातील ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Loading...
You might also like