Savitribai Phule Pune University (SPPU) | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देणार मराठी संवर्धनाला चालना, युवासेनेकडून कुलगुरुंना निवेदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ Savitribai Phule Pune University (SPPU) आणि विद्यापीठाच्या अंर्तगत येणारी सर्व महाविद्यालये आणि संलग्न शैक्षणिक संस्थांचे (Educational Institutions) नाम फलक मराठी भाषेत (Marathi Language) करावेत. विद्यापीठातील स्वतंत्र मराठी भाषा भवनाच्या (Marathi Bhasha Bhavan) स्थापनेला गती द्यावी, या मागण्यांचे निवेदन युवासेनेचे सहसचिव किरण साळी (Yuvasena Joint Secretary Kiran Sali) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठाचे Savitribai Phule Pune University (SPPU) कुलगुरू डॉ. करमळकर (Vice Chancellor Dr. Karmalkar) यांना देण्यात आले. या वेळी कुलसचिव प्रफुल्ल पवार (Registrar Praful Pawar) ही उपस्थित होते.

 

यावेळी कुलगुरुंनी निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. युवासेनेच्या मागण्या रास्त आहेत. तुम्ही आंदोलन (Agitation) करण्याची गरज नाही. सर्व संलग्न महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थाना तातडीने आपले नाम फलक मराठीत करण्याचे आदेश देण्यात येतील, त्याबाबत 24 तासांत पत्रक काढण्यात येईल. मराठी भाषेला चालना देण्यासाठी स्वतंत्र मराठी भाषा भवनाच्या इमारतीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी लवकर संबंधितांची बैठक घेण्यात येईल. मराठी भाषेचे संवर्धन (Preservation) करण्यात येईल, अशी ग्वाही ही कुलगुरूंनी दिल्याची माहिती किरण साळी यांनी दिली आहे.

या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ Savitribai Phule Pune University (SPPU) कक्षाचे आकाश शिंदे,
रोहित कुचेकर, मनिषा धारणे, तृप्ती ढगे, दिपाली घाडगे, युवासेना पदाधिकारी तुफान उंडे, गौरव पापळ, राहुल केवटे,
प्रथमेश भुकण, अविनाश राऊत, विशाल काकडे, नितीन शिंदे, मंगेश साळसकर, ओमकार गायकवाड, हरि भाऊ राठोड,
सुयश कांबळे, प्रविण दानवले, सागर धुमाळ, योगेश ढेबे, सचिन पाटोळे, अशोक सर्जेराव, सुनील राठोड,
आकाश जगताप, आदर्श नवले, गणेश जाधव, अनिकेत जाधव, आदित्य रोकडे, अक्षय माळकर, आशिष शिर्के,
आकाश शेळके, सिद्धांत भालेराव, सौरभ कोंढाळकर, केदार इंगळे, सुरज जाधव, आदित्य मलठणकर यांसह युवासैनिक उपस्थित होते.

 

Web Title :- Savitribai Phule Pune University (SPPU) | Savitribai Phule Pune University to promote Marathi culture, statement from Yuvasena to Vice Chancellor

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tara Sutaria Spotted | एवढे छोटे कपडे घालून खरेदीला निघाली तारा सुतारिया, कपडे पाहून रस्तावरील लोक तिला बघतच बसले..

 

Ravi Shastri | ‘बीसीसीआयमुळे मागील काही वर्षे मी कॉमेंन्ट्री केली नाही’; शास्त्री BCCI वर बरसले

 

Ameesha Patel Airport Photo | ‘गदर’ चित्रपटातील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री आता दिसते अशी, एअरपार्टवरील फोटो झाले व्हायरल..