सा. फुले महिला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाईन – मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम 9 फेब्रुवारी रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लायन्स क्लबचे प्रांतिय अधिकारी डाॕ. शाळीग्राम भंडारी हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मावळ शिक्षण प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष डाॕ. कृष्णकांत वाढोकर होते. या कार्यक्रमासाठी मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य प्रा. वसंत पवार, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कृष्णराव मोहिते, संभूस मॅडम आणि आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश शिंदे यांनी उपस्थित राहून विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.

शैक्षणिक वर्षे 2018-19 मध्ये विविध स्पर्धेमध्ये व परिक्षेमध्येWomen’s College प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थीनींचा गौरव प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते  करण्यात आला. तसेच प्रा. देविदास पवार यांनी तयार केलेल्या ‘पुणे जिल्हा आणि मावळ तालुक्यातील किल्ले व ऐतिहासिक स्थळे’ या माहितीपुस्तकेचे अनावरण करण्यात आले. महाविद्यालयाचा या वर्षीचा आदर्श विद्यार्थींनीचा पुरस्कार T.Y.B.Com या वर्गातील कु. शुभांगी प्रशांत शिंदे या विद्यार्थ्यांनीला देण्यात आला. पारितोषिक वितरणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थीनींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डाॕ. शाळीग्राम भंडारी यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना आपले व्यक्तिमत्व कसे असावे व त्यात बदल कसा घडवावा या संदर्भात माहिती दिली. व्यक्तिमत्वाचा विकास हा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अवलंबून असतो असे मत व्यक्त केले. पाहुण्याचे स्वागत महाविद्यालयातील विद्यार्थीनींच्या लेझीम पथकाने केले. पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. एस. डब्ल्यू मिसाळ सर यांनी केले. त्यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे ध्येय धोरणाबरोबरच महाविद्यालायातील विद्यार्थीनींना उच्चपदापर्यंत पोहचवण्यासाठी महाविद्यालय सर्वोत्तपरीने प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. योगिता शिंदे यांनी शैक्षणिक वर्ष 2018 -19 या वर्षात महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती व महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. तसेच मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य प्रा. वसंत पवार यांनी मार्गदर्शन करताना विविध स्पर्धामध्ये व परिक्षेमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थीनींचे अभिनंदन करून हा प्रगतीचा आलेख असाच उंचावत जावा असे मत व्यक्त केले.

यावेळी पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भागवत देशमुख यांनी केले. तर आभार प्रा. ज्ञानेश्वर सावळे यांनी मानले.  सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सोमनाथ कसबे व प्रा. अपर्णा कुंकूलोळ यांनी केले. आभार प्रा. डाॕ. समिंदर घोक्षे यांनी मानले.   हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनींनी सहकार्य केले.