नीरा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) – थोपटेवाडी येथील असेंड इंटरनँशनल स्कुल, नीरा येथील ज्युबिलंट इंग्लिश मिडियम स्कुल, सौ. लि. रि. शहा कन्या शाळा, जि. प. शाळा नं. २ अशा
नीरा व परिसरातील विविध शाळांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘बालिका दिन’ म्हणून
उत्साहात साजरी करण्यात आली.

थोपटेवाडी येथील असेंड इंटरनँशनल स्कुल मध्ये झालेल्या कार्यक्रमात ज्ञानज्योती, भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला कोळविहीरे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुरेश झगडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांची वेशभूषा करून फुले दांपत्यांंचे जीवन चरित्र प्रकट केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुलेंचे कार्य व त्यांच्या इतिहासाला आपल्या मनोगतातून उजाळा दिला. शिक्षिका स्मिता गायकवाड यांनी ‘मी सावित्री बोलतेय’ या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे संस्थापक सोमनाथ खोमणे, सचिव नीता खोमणे, मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव, उपमुख्याध्यापिका सुषमा भुंजे, पर्यवेक्षक विठ्ठल झगडे, सोमनाथ तांदळे आदी उपस्थित होते. स्वागत जस्मिन बागवान यांनी केले. तर सुत्रसंचालन स्वप्निल पवार यांनी केले. आभार दिपाली बारवकर यांनी मानले.

दरम्यान जि.प.शाळा नं.२ मध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा जयश्री शिंदे यांच्या हस्ते सावित्रीबाईंंच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/