सावता परिषदेच्या वतीने सावता महाराज विचारधारा सप्ताह !

इंदापूर : प्रतिनिधी (सुधाकर बोराटे) –   संतशिरोमणी सावता महाराज यांच्या समाधी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त दि १३ जुलै ते १९ जुलै दरम्यान संत सावता महाराज विचारधारा सप्ताह चे आयोजन सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्याध्यमातुन श्री.क्षेत्र अरण येथे करण्यात आले असल्याची माहीती सावता परीषदेचे प्रदेश संघटक संतोष राजगुरू यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

रविवार दि.१९ जुलै २०२० रोजी सावता महाराजांचा ७२५ वा समाधी -पुण्यतिथी सोहळा असुन यावर्षी कोरोनामुळे लागु करण्यात आलेल्या निर्बंधानुसार दरवर्षीप्रमाणे होणारे अखंड हरिनाम सप्ताह व इतर कार्यक्रम जाहिरपणे घेता येणार नाहीत. मात्र यामध्ये खंड पडु न देता सावता महाराजांच्या चरित्र्याचा व विचार कार्याचा जागर व्हावा यासाठी डिजीटल पध्दतीने फेसबुक लाईव्ह कार्यक्रम घेण्याचा निर्णय संघटनेच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.सोशल स्टन्स नियमांचे पालन करूनच हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

दि.१३ जुलै रोजी सावता महाराजांचे वंशज ह.भ.प.रविकांत महाराज वसेकर ( श्रीक्षेत्र अरण) ,दि.१४ जुलै रोजी भाषाप्रभु ह.भ.प.प्रभु महाराज माळी (श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ) ,दि.१५ जुलै रोजी रामाणाचार्य ह.भ.प.प्रा.नाना महाराज कदम (बंकटस्वामी संस्थान ,नेकनुर), दि.१६ जुलै रोजी गायनाचार्य ह.भ.प.कु.गितांजली महाराज अभंग (हरिहरी वारकरी संस्था ,कोर्टी करमाळा) ,दि.१७ जुलै रोजी कीर्तनकेसरी ह.भ.प.अक्रुर महाराज साखरे (धोंडराई-गेवराई) ,दि.१८ जुलै रोजी वर्डबुक ऑफ रेकाँर्ड पुरस्कार प्राप्त वैराग्यमुर्ती ह.भ.प.रामकृष्ण महाराज रंधवे बापु (पाटोदा ) व दि.१९ जुलै रोजी कुट अंभग प्रवक्ते, कीर्तनकेसरी ह.भ.प.महादेव महाराज राऊत ( म्हाळस जवळा -बीड ) हे सावता महाराजांच्या विचाराचा जागर दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत करणार आहेत.

दि.१९ जुलै रोजी पुण्यतिथी दिनी सकाळी १० वा.सावता महाराज वंशज श्री रमेश महाराज वसेकर श्रीक्षेत्र अरण यांचे आशीर्वाद ,सकाळी १०३० वा.सावता महाराज यांच्या संजिवन समाधीचे लाईव्ह दर्शन ,दुपारी १२ वा.भजनसम्राट ह.भ.प.सदानंद महाराज मगर (श्रीक्षेत्र पैठण ) यांचे संगीत भजन व सायंकाळी ७ वा.श्रीक्षेत्र अरण येथुन लाईव्ह महाआरती चे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती सावता परिषदेचे प्रदेश संघटक संतोष राजगुरू व इंदापूर तालुकाध्यक्ष प्रकाश नेवसे यांनी इंदापूर येथे दीली.