पुणे : ‘या’ नवीन जागेवर होणार सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेला ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यंदा मकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल या नवीन जागेवर होणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ १२ ते १६ डिसेंबर होणार आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती दिली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f737dc6f-cc85-11e8-99d1-5bf1f309897e’]

हा  महोत्सव गेल्या ३२ वर्षांपासून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग  मैदानावर घेतला जातो. मात्र, या संगीत महोत्सवाच्या काळातच शाळेच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्यामुळे मैदान उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे शाळेकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे मंडळ नवीन जागेचा शोध घेत होते. यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक रसिक, संस्थाचालक आणि हितचिंतक यांनी संस्थेशी संपर्क साधून याबाबत काय करता येईल, याबद्दल विचारणा केली. त्यानंतर मकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

महाराष्ट्रीय मंडळाशी भीमसेनजींचा दीर्घकाळ अतिशय निकटचा संबंध होता. मंडळाच्या विविध उपक्रमांत ते सहभागीही होत असत.  महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांनी आर्य संगीत प्रसारक मंडळास मुकुंदनगर येथील क्रीडा संकुलातील मैदान या महोत्सवासाठी देण्याचे  मान्य केले, याबद्दल जोशी यांनी आभार व्यक्त केले आहेत.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’00c9d086-cc86-11e8-8889-8701c58d22e8′]

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दरवर्षीप्रमाणेच दिमाखात आणि अभिजात संगीतातील अनेक नव्या जाणिवांसह यंदाही साजरा होईल आणि त्यासाठी गेली ६५ वर्षे रसिक, हितचिंतक आणि प्रायोजक यांच्याकडून जे सहकार्य मिळत आले, तसेच यापुढेही मिळेल, असा विश्वास श्रीनिवास जोशी यांनी व्यक्त केला आहे.

आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी म्हणाले कि , ‘पुण्यातील अनेक शिक्षणसंस्था महोत्सवास मनापासून आणि विनाअट मदत करण्यास तयार असल्याचेही चित्र यामुळे समोर आले’

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी सुरू केलेला हा अभिजात संगीताचा कार्यक्रम जागतिक पातळीवर वाखाणला गेला आणि रसिकांनी व हितचिंतकांनीही हा महोत्सव आपलाच असल्याचे अनेकदा जाहीरपणे सांगितले. जागाबदलाच्या निमित्ताने या सगळ्या भावनांची उजळणी झाली, असेही जोशी यांनी नमूद केले.
[amazon_link asins=’B0796QP4LS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’065270eb-cc86-11e8-a174-fdeb60ae12ee’]

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाविषयी –

अभिजात संगीताचा जगातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा संगीत महोत्सव म्हणून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव प्रसिद्ध आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी त्यांचे गुरु सवाई गंधर्व यांच्या स्मृतीनिमित्त १९५२मध्ये या महोत्सवाचा प्रारंभ केला. तेव्हापासून गेल्या ६५ वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन केले जाते, यंदाचे हे ६६वे वर्ष आहे. सर्वसामान्य व्यक्तीलाही परवडेल अशा कमीत कमी तिकीट दरांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभिजात संगीताचा हा महोत्सव रसिकांना दरवर्षी अनुभवता येतो.