गरोदरपणानंतर चेहऱ्यावर झालेल्या सुरकुत्या दूर करण्यासाठी ‘हे’ आहेत उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम

प्रश्न –   गरोदरपणा नंतर माझ्या चेहर्‍यावर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत. माझे केस गळणे ही सुरू झाले आहेत. घरगुती उपाय करूनही समस्या दूर होत नाही नाही?

उत्तर –   गरोदरपणात शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. त्यातील प्रोजेस्टन हा एक हार्मोन्स आहे. जो गरोदरपणात तयार होतो. यामुळे, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. याशिवाय ताणतणाव आणि लोहाची कमतरता ही प्रमुख कारण आहे. यासाठी भरपूर लोहयुक्त आहार घ्या. फळे, हिरव्या पालेभाज्या आणि नाचणी भरपूर प्रमाणात खाल्ले पाहिजे. आपले वाढलेले वजन कमी केले पाहिजे. या सुरकुत्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे वाढतात. अल्ट्राव्हायोलेट किरणे घरगुती गॅसची ज्योत, संगणक, मोबाइल स्क्रीन आणि सीएफएलमध्ये देखील दिसून येते. केस गळती टाळण्यासाठी प्रथिनेयुक्त आहार घेतला पाहिजे.