उन्हाळयात घामोळ्यांना करा बाय ! बाय ! ; करा हे उपाय

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – उन्हाळा आला की आपसूकच उन्हाळ्यात होणारे त्वचाविकार डोके वर काढतात. त्यातही उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास सर्वाधिक होतो. मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत लहान व्यक्तींना घामोळ्यांचा खूप त्रास होतो. लहान मुलांची त्वचा संवेदनशील असल्यामुळे त्यांना हे त्वचाविकार लवकर जडतात. घामोळ्याचे तसे काही गंभीर दुष्परिणाम नसल्यानं घामोळ्यांना गांभीर्यानं घेतलं जात नाही. मात्र काही काळजी न घेतल्यास लहान मुलांमधील घामोळ्याची समस्या गंभीर होऊ शकते.

घामोळं येण्याची कारणे

–घामाच्या ग्रंथी पूर्ण विकसित झालेल्या नसतात
–शरीराची स्वच्छता न ठेवणे
–घट्ट आणि जास्त कपडे घालणे
–हवेशीर वातावरणात न ठेवणे
–जास्त गरम पाण्याने अंघोळ

घामोळ्यांवर काय कराल उपाय

–तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लोशन किंवा पावडर लावावी
–थंड किंवा कोमट पाण्यानं अंघोळ घालावी
–बाळ असल्यास थंड पाण्यात स्पंज बुडवून त्यानं शरीर स्वच्छ पुसावं
–थंड वातावरणात ठेवावं
–सैलसर आणि कॉटनचे कपडे घालावेत

लहान मुलांना घामोळं आल्यास काय काळजी घ्यावी

— जास्त वेळ मुलांना पाण्यात राहू देऊ नका
–घाम शरीरावर तसाच राहू देऊ नका
–घामोळे फोडू नका त्यानं इन्फेक्शन होईल
–लहान बाळांना कपड्यात गुंडाळून ठेवू नका

त्वचाविकार तंज्ञानानुसार , “लहान मुलांना घामोळं आल्यानंतर आम्ही काही लोशन आणि पावडर वापरण्याचा सल्ला देतो. यामुळे त्वचेवरील छिद्र बंद होत नाहीत. मात्र घामोळं वाढल्यास आणि इन्फेक्शन झाल्यास डॉक्टरांकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच त्यावर उपचार करावेत. विशेष म्हणजे घामोळं हातानं फोडू नका त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.

“लहान मुलांना घामोळं आल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा त्यांना घामोळं येऊ नये यासाठी प्रयत्न करावे. यासाठी त्यांना नियमित अंघोळ घालावी. मात्र जास्त वेळ पाण्यात राहू देऊ नये कारण त्यांची त्वचा संवेदनशील असते. अंघोळीनंतर शरीर स्वच्छ पुसून सौम्य मॉईश्चरायझर लावावं. तसंच मुलं खेळल्यानंतर त्यांना घाम आल्यास घाम तसाच शरीरावर राहू देऊ नका. त्यांना थंड किंवा कोमट पाण्यानं अंघोळ घालावी. लहान बाळ असल्यास थंड पाण्यात स्पंज बुडवून त्यानं शरीर नीट पुसून घ्यावे आसा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.