Sayaji Shinde | अभिनेते सयाजी शिंदेवर पुणे बंगळुरु महामार्गावरील झाडाचे पुनर्रोपण करत असताना मधमाशांकडून हल्ला

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्यावर पुणे बेंगलोर महामार्गावर (Pune Bangalore Highway) मधमाशांनी हल्ला केला आहे. पुणे बेंगलोर महामार्गाची रुंदीकरण सुरू असल्यामुळे सयाजी शिंदे यावेळी तेथे झाडांचे पुनर्रोपण करत असताना ही घटना घडली आहे. सयाजी शिंदे (Sayaji Shinde) हे तासवडे येथे उपस्थित होते. यावेळेस मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. तातडीने त्यांना त्यांच्या वाहनात बसवण्यात आले. सध्या ते सुखरूप असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

अभिनेते सयाजी शिंदे यांनी त्यांच्या अभिनयाने आजवर सर्वांचीच मने जिंकली आहेत.
हिंदी बरोबरच दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतही त्यांनी त्यांच्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत.
या व्यतिरिक्त ते त्यांच्या सह्याद्री देवराई संस्थेमुळे (Sahyadri Deorai Sanstha) जास्त ओळखले जातात.
आजवर त्यांनी अनेक वृक्षांची लागवड केली आहे.
त्याचबरोबर सयाजी शिंदे हे नेहमीच लोकांना झाडे लावण्याचा संदेश देत असतात.
तर काही वर्षांपूर्वीच सयाजी शिंदे आणि चित्रपट लेखक अरविंद जगताप यांनी एक उपक्रम आयोजित केला होता.
यावेळी राज्यभरातील खूप जुनी झाडांची माहिती एकत्रित करण्यासाठी त्यांनी सह्याद्री देवराई कडून दोन नंबर
लोकांना दिले होते.
ज्यावर तुम्ही तुमच्या जवळपास असलेल्या जुन्या झाडासोबतचा एक फोटो आणि ते झाड किती वर्ष जुने आहे,
कुठे आहे याची संपूर्ण माहिती व्हाट्सअप करायची होती. या उपक्रमाला नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता.
या उपक्रमाच्या माध्यमातून विविध ठिकाणातील सर्वात जुनी झाडांची माहिती आज या संस्थेकडे उपलब्ध आहे.

सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ते आता ‘घर, बंदूक, बिरयानी’
या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात सयाजी शिंदे यांच्यासोबत नागराज मंजुळे, आकाश ठोसर हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज आणि हेमंत अवताडे यांनी केले आहे.
सयाजी शिंदे यांच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title :- Sayaji Shinde | actor sayaji shinde attacked by bees at pune bangalore highway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parbhani Crime News | कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात शाळेसाठी निघालेल्या दोन शिक्षकांचा मृत्यू

Pune Crime News | संकष्टी चतुर्थीला ‘दगडुशेठ’जवळ ‘वसुली’चा प्रयत्न करणारा पोलीस कर्मचारी निलंबित

Jalna Crime News | हिंगोलीतील जवानाचा गावी परतताना रेल्वेतून पडून मृत्यू; लेकीला पाहण्याची इच्छा राहिली अपूर्ण