Sayaji Shinde On Sushma Andhare | ‘सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिला’, राष्ट्रवादीच्या प्रवेशावर सुषमा अंधारेंचा निशाणा; शिंदेंचा पलटवार; म्हणाले – ‘मी सुषमा अंधारे यांना विचारून निर्णय घेत नाही’

Sayaji Shinde On Sushma Andhare | sushma andhare criticism on ncp ajit pawar entry and now the sayaji shinde counterattack

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sayaji Shinde On Sushma Andhare | प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात (Ajit Pawar NCP) प्रवेश केल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. सयाजी शिंदेंच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशानंतर त्यांच्यावर समाजमाध्यमातूनही टीका करण्यात येऊ लागली. विशेष म्हणजे शिवसेनेच्या (Shivsena Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही सयाजी शिंदेंचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली. सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिला असे त्यांनी म्हंटले आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, ” कायम खलनायक भूमिका करणारे सयाजी शिंदे आमच्यासाठी नायक होते. मात्र, आता खलनायकी विचारधारेसोबत गेले, त्यांनी गुलिगत धोका दिला”, असे म्हणत सुषमा अंधारेंनी निशाणा साधला. यावरून आता सयाजी शिंदे यांनी अंधारेंवर पलटवार केला आहे.

सयाजी शिंदे म्हणाले, “मी सुषमा अंधारे यांना विचारून निर्णय घेत नाही. मला जे माझे निर्णय वाटले ते मी घेतले आहेत. त्यांना ते चुकीचं वाटलं तर त्यांना धन्यवाद. सध्या खूप जण प्रतिक्रिया देत आहेत, आता या सगळ्यांवर मी प्रतिक्रिया द्यायला हवी असं काही नाही.

मला जी भूमिका पटली ती मी घेतली. आता काही जणांना ती खलनायकी वाटत असेल त्याकडे मी लक्ष देणार नाही.
यात न पडलेलं बरं, वयाची पासष्टी आली आहे. आतापर्यंतचे माझे निर्णय मीच घेतलेले आहेत.
मी घेतलेला निर्णय योग्य आहे, हे तुम्हा सर्वांना लवकरच कळेल”, असेही सयाजी शिंदे यांनी म्हंटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

Ali Daruwala | भाजपचे प्रवक्ते अली दारुवाला यांची पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या नियामक मंडळावर सिनेट सदस्य म्हणून नियुक्ती

Sharad Pawar NCP – Dhananjay Munde | शरद पवार धनंजय मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम करणार?; परळीत नव्या दमाचा उमेदवार रिंगणात उतरणार

IPS Shivdeep Lande | आयपीएस शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, राजकीय प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम, आता मोठी जबाबदारी

Total
0
Shares
Related Posts