Sayali Sanjeev | अभिनेत्री सायली संजीवने आपल्याबद्दल पसरवणाऱ्या अफवांबद्दल केले मोठे वक्तव्य; म्हणाली “अफवा म्हणजे….”

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री सायली संजीवचे (Sayali Sanjeev) नाव छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये आवर्जून घेतले जाते. सायलीने आज तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक अशी वेगळी जागा निर्माण केली आहे. सायलीने आजवर अनेक मालिका चित्रपटांमध्ये काम केले आहे. सायली नेहमीच तिच्या स्पष्ट वक्तेपणामुळे ओळखली जाते. सायली तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. सायलीला (Sayali Sanjeev) अनेकदा अनेक अफवांचा सामना करावा लागला. आता याबद्दल तिने तिचे मत मांडले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याला सायली संजव हिने हजेरी लावली होती. यंदाच्या कार्यक्रमाची टॅगलाईन ‘चर्चा रंगणार बातमी गाजणार’ अशी होती. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या दरम्यान एका मुलाखतीत सायलीने तिच्यावर केल्या जाणाऱ्या अफवांना ती कशा पद्धतीने सामना करते यावर भाष्य केले आहे.
यावेळी बोलताना सायली (Sayali Sanjeev) म्हणाली, “माझ्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांचा मी जास्त विचार करत नाही.
त्यामुळे त्याचा मला त्रासही होत नाही. अनेकदा माझ्यासोबत असे झाले आहे.
शेवटी आपण त्यांना अफवा म्हणतो अफवा म्हणजे काय ती खोटी गोष्ट असते आणि कधी ना कधी खरं हे लोकांसमोर येतेच.
त्यामुळे कशाला आपण स्वतःला एवढा त्रास करून घ्यायचा”. काही महिन्यांपूर्वीच सायलीचे नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याच्याशी जोडले गेले होते.
या सर्व अफवा खोट्या असल्याचे सायली संजीवने स्पष्ट केले होते. त्यामुळे या चर्चाना पूर्णविराम मिळाला होता.
Web Title :- Sayali Sanjeev | actress sayali sanjeev talked about rumours about her and how does she handle that
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | ‘ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम’, भास्कर जाधवांचा टोला
Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले