Sayali Sanjeev | अशोक सराफांच्या ‘त्या’ एका सल्ल्याने बदललं सायली संजीवचे आयुष्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सायली संजीव (Sayali Sanjeev) हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. काहे दिया परदेस या मराठी मालिकेतून ती घराघरात पोहोचली. यानंतर तिने आपला मोर्चा मराठी चित्रपटांकडे वळवला. सध्या ती ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानिमित्ताने सायली संजीवने (Sayali Sanjeev) तिच्या यशस्वी करिअरबद्दल अनेक खुलासे केले. यामध्ये तिने तिच्या आयुष्यात महत्त्वाच्या असलेल्या दोन व्यक्तींबद्दल सांगितले.

 

गोष्ट एका पैठणीची हा चित्रपटात सायली संजीव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिने नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत यशस्वी होण्यामागे दोन महत्त्वाच्या व्यक्ती असल्याचं सांगितले. हे दोन व्यक्ती म्हणजे एक तिचे वडील संजीव आणि दुसरे म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ. सायली संजीव ही अशोक सराफ यांना वडिलांच्या समान मानते.

 

सायली (Sayali Sanjeev) म्हणाली की, “मी जेव्हा अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मला माझ्या बाबांनी आणि अशोक सराफ यांनी तू जे काही काम घेतेस त्यात तुझं तू 100 टक्के योगदान दे. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड कधीच करू नकोस असा सल्ला दिला. तो कटाक्षानं पाळण्याचा मी प्रयत्न करत आहे. यामुळे मी माझ्याकडे चालून आलेल्या कोणत्याच कामाला नाही म्हणत नाही.

 

‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट गेल्या 2 डिसेंबर 2022 चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्याबरोबर मृणाल कुलकर्णी,
मिलिंद गुणाजी, शशांक केतकर, सुहिता थत्ते, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, आदिती द्रविड
या कलाकारांच्यादेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

 

Web Title :- Sayali Sanjeev | ashok saraf give most important advise to marathi actress sayali sanjeev share story during interview

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘शाळा सुरू करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांनी भीक मागितली’; चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान

MNS Leader Vasant More | “जिथे फुले वेचली तिथे काटे …”; वसंत मोरेंचा शहर कार्यालयात येण्यास नकार

SSC HSC Board Exams | दहावी, बारावीच्या परीक्षार्थींनो सावधान; बोर्डाने बदलले हे दोन नियम