Sayali Sanjeev | गोष्ट एका पैठणीसाठी केलेल्या ‘त्या’ कामाचा अखेर सायलीनं केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन : Sayali Sanjeev | अभिनेत्री सायली संजीव मुख्य भूमिकेत असलेली ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट येत्या २ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सायली एक साधी शिवणकाम करणारी गृहिणी दाखवली आहे. जी घरात बायकांच्या साड्यांना फॉल पिको आणि ब्लाऊज शिवून देते. या अभिनयासाठी तिने अनेक कष्ट घेतले आहे. या भूमिकेत ती नैसर्गिक रित्या दिसण्यासाठी खूप काही गोष्टी तिने केल्याचा खुलासा सायलीने केला आहे. (Sayali Sanjeev)

अभिनयाच्या जोरावर ही भूमिका नक्कीच साकारता आली असती. मात्र या भूमिकेत नैसर्गिकता आणण्यासाठी सायलीने खूप मेहनत घेतल्याचे तिने सांगितले. या मागचे एक सिक्रेट ही तिने उघड केले. याविषयी सांगताना सायली म्हणाली, “या भूमिकेत नैसर्गिकता आणण्यासाठी त्या भूमिकेशी एकरूप होण्यासाठी मी दोन दिवस शिवण क्लास लावला होता. या दोन दिवसाच्या शिवण क्लास मध्ये मी मशीन वरच्या बारीक-सारीक गोष्टी जाणून घेतल्या होत्या. गोष्ट एका पैठणी मध्ये मी अतिशय जुन्या काळातील मशीनवर काम करताना तुम्हाला दिसेल. त्यामुळे मला शिलाई मशीन हाताळणे त्यामध्ये तेल टाकणे, सुई मध्ये दोरा भरणे या सगळ्या गोष्टी माहीत असणे तेवढेच गरजेचे होते”. (Sayali Sanjeev)

पुढे बोलताना सायली म्हणाली, “या संपूर्ण गोष्टीत कुठेही माझा अभिनय अनैसर्गिक वाटू नये यासाठी
मी मनापासून खूप प्रयत्न केले. म्हणूनच मी हा दोन दिवसाचा क्लास लावला होता.
शिवणकामाच्या क्लासमुळेच मला शिवणकामातील बारकावे शिकता आले.
ज्याचा खूपच फायदा मला या चित्रपटात झाला आहे.
एखादी भूमिका साकारताना त्यामध्ये आपण गुंतून जाऊन ती भूमिका करणे याला जास्त न्याय देण्यासारखे होते.
तेव्हाच आपण प्रेक्षकांची मने जिंकू शकतो” असे सायलीने म्हटले आहे.

Web Title :- Sayali Sanjeev | sayali sanjeev join 2 day sewing class for movie goshta eka paithani

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prathamesh Parab | प्रथमेश परबच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘त्या’ मैत्रिणीने केलेली पोस्ट चर्चेत

Maharashtra Cabinet Decision | 75000 पदांच्या नोकरभरतीला गती देणार, शिंदे सरकारचा महत्त्वाचा निर्णय (व्हिडिओ)