काय सांगता ! होय, Love you म्हणत ‘तो’ पोलिसांच्याच गाडीखाली घूसला

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – सिडको, एन आठ येथील नेहरू उद्यानासमोर एका तळीरामाने जोरदार गोंधळ घातला. नशेत बुडालेल्या एका तरुणाने चक्क सर्वसामान्य नागरिकच काय पण पोलिसांना देखील सोडले नाही. सुरुवातीला या तरुणाने लहान मुलांना मारहाण केली. त्यानंतर अनेकांना शिव्या देखील दिल्या. त्यानंतर तरुणाने रस्त्यावर थेट आडवे पडत गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला.

रस्त्यावरच्या कारनाम्यानंतर तळीराम पुन्हा उद्यानाबाहेरील गाड्यांकडे वळला. या ठिकाणी उभ्या असलेल्या सर्व गाड्या त्याने पाडल्या. वारंवार शिव्या देऊन बेफिकीर पणे तो लोकांवर धावून जात होता अखेर पोलिसांनी त्याला ताळ्यावर आणला.

पोलिसांनाच म्हणाला लव्ह यु
रस्त्यांवर आणि उद्यानासमोर गोंधळ घालताना दोन पोलिसांनी या तळीरामाला पाहिला आणि त्यांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु हे सर्व आपल्या हाताबाहेर जातंय असं लक्षात येताच पोलिसांनी त्याला आपला खाक्या दाखवल्या आणि नशेखोर पोलिसांच्या पाया पडत थेट लव्ह यू ची भाषा करू लागला. एवढेच नाही तर आपल्या आसपास असलेला एक दगड उचलून स्वतःच्याच अंगावर टाकत होता.

पोलिसांच्याच गाडीखाली घुसला
रस्त्यावरील गाड्या अडवण्यासाठी नशेखोराने रस्त्यावर थेट आडवे पडण्याचा पराक्रम केला पोलिसांनी त्याला सरळ ओढून पुन्हा रस्त्याच्या कडेला आणले शेवटी पोलीस वाहन आल्यानंतर नागरिकांच्या मदतीने त्याला गाडीत टाकण्याचा प्रयत्न करत असताना त्याने थेट पोलिसांच्या गाडीखाली उडी मारली आणि आता इथेच मरतो असे म्हणू लागला अखेर पोलिसांनी त्याला गाडीत टाकले आणि सिडको पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

बघ्यांची मोठी गर्दी
यावेळी या सगळं कारनामा पाहण्यासाठी रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. लोक गाडी थांबवून हा कारनामा मोठ्या आनंदात पाहत होते. नशेखोराने उद्यान बाहेरील मुलांना त्रास दिल्याने एका पालक चिडले आणि थेट त्या तरुणावर धावून गेले. शेवटी पोलिसांनीच त्याला वाचवले. बघ्यांच्या गर्दीतील अनेक जण मात्र मोबाइल वरती व्हिडीओ काढण्यात गुंग होते.

 

फेसबुक पेज ला लाईक करा 👉: https://www.facebook.com/policenama/