काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी ‘या’ नेत्याला मिळायचे लाखो रूपये, ‘फुटीरतावादी’ नेत्याने केला आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आल्यामुळे सध्या जम्मू-काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आता स्थानिक पक्ष असणाऱ्या ‘हुर्रियत’चे प्रमुख नेते सय्यद अली गिलानी यांना लाखो रुपये मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काश्मीरमधीलच एका फुटीरतावादी नेत्याने चौकशीदरम्यान हा गौप्यस्फोट केला, याबाबतचे सर्व पुरावे त्यांनी नष्ट केले असल्याचेही या फुटीरवादी नेत्याने सांगितले.

निधी देणारे कोण आहेत

रमजानच्या महिन्यात तहरिक-ए-हुर्रियत आपल्या वृत्तपत्रात देणगीसाठी जाहिराती देत असे. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक व्यापारी आणि पदाधिकारी पक्षाला देणगी देत असत. यापैकी ६० टक्के निधी जिल्हाध्यक्षांकडे जात असे तर ४० टक्के निधी गिलानी यांना मिळायचा, असेही या नेत्याने सांगितले.

निधीसाठी अनेक गुप्त व्यक्तींकडून सहा ते आठ लाखांच्या देणग्या येतात. बहुतांश लोकांना याबद्दल माहिती नाही. मात्र, यामध्ये काश्मीरमधील व्यापारी जहूर वटाली याचा मोठा वाटा असल्याचेही संबंधित फुटिरतावादी नेत्याने सांगितले.

या माहितीच्याआधारेच लाचलुचपत प्रतिबंध विभागाने वटाली आणि जम्मू-काश्मीर बँकेविरोधात कारवाई केली होती. तसेच वटाली याच्यासह अनेक फुटीरतावादी नेत्यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र सादर करण्यात आले होते. मात्र, यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वटालीला जामीन मंजूर केला होता. रमजानच्या महिन्यात तहरिक-ए-हुर्रियत आपल्या वृत्तपत्रात देणगीसाठी जाहिराती देत असे.

आरोग्यविषयक वृत्त