SB Road Pune Crime | प्रेमसंबंध तोडून टाकल्याने तरुणीला मारहाण, सेनापती बापट रोडवरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – SB Road Pune Crime | प्रेमसंबंध (Love Affair) तोडून टाकल्याने (Break Up) तरुणीला मारहाण करण्यात आल्याची घटना डेक्कन (Deccan) भागात घडली. या प्रकरणी एका रिक्षाचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.25) दुपारी पावणे एकच्या सुमारास सेनापती बापट रोडवरील (Senapati Bapat Road) बालभारती ऑफिस (Balbharti Office Pune) समोर घडला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी (Deccan Police) एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सिंहगड रोड (Sinhagad Road) परिसरात राहणाऱ्या 30 वर्षीय तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मिनाज इमामुद्दिन अहमद Minaj Imamuddin Ahmed (वय-29 रा. दिप बंगला चौक, पुणे) याच्यावर आयपीसी 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि आरोपी अहमदचे प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंध तोडून टाकल्याने तरुणी आरोपी अहमद सोबत बोलत नव्हती. याचा राग त्याच्या मनात होता. त्यानंतर त्याने तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली. तिचा पाठलाग करू लागला.

प्रेमसंबंध ठेवण्यास तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने तिला सेनापती बापट रोडवरील बालभारती ऑफिस समोर गाठले.
आरोपी अहमद याने तरुणीला शिवीगाळ करुन तिला हाताने मारहाण केली.
मारहाणीनंतर घाबरलेल्या तरुणीने डेक्कन पोलिसांकडे तक्रार दिली. अहमद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress News | ‘कट-कारस्थानांचा डीएनए’ हा भाजप’चा.. काँग्रेसचा नव्हे ..! ‘वारसा हक्क संपत्तीकर लावण्याचे मनसुबे २०१९साली भाजपचेच..!! – राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी

Rape Case Pune | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार