SBI ने सुरक्षित ऑनलाइन बँकिंगसाठी Yono Lite App मध्ये दिले एक नवीन फीचर, जाणून घ्या डिटेल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – SBI | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, आता एसबीआयचे ऑनलाइन बँकिंग आणखी सुरक्षित आहे. YONO Lite app चे लेटेस्ट अ‍ॅप डाऊनलोड करा. एसबीआयने ऑनलाइन बँकिंगला आणखी सुरक्षित बनवण्यासाठी YONO Lite app मध्ये एका नवीन सिक्युरिटी फीचर (New Security Feature) चा समावेश केला आहे.

बँकेने आपल्या ग्राहकांना ऑनलाइन फ्रॉडपासून वाचवण्यासाठी अ‍ॅप अपग्रेड केले आहे. या नवीन सिक्युरिटी फीचरद्वारे SBI YONO अकाऊंट इतर कुणी आणि दुसर्‍या फोनवरून अ‍ॅक्सेस करता येणार नाही.

केवळ रजिस्टर्ड नंबरवरून चालवू शकता
या नवीन सिक्युरिटी फीचरमध्ये एसबीआयच्या ऑनलाइन बँकिंगसाठी जर तुम्ही योनो अ‍ॅपचा वापर करत असाल तर तुम्ही तेव्हाच तुमचे अकाऊंट अ‍ॅक्सेस करू शकता जेव्हा आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून योनो अ‍ॅपचा वापर करत असाल. एखाद्या दुसर्‍या मोबाइल नंबरवरून एसबीआय योनोचा वापर करूशकणार नाही.

ऑनलाइन फ्रॉडला लागेल लगाम
या सिक्युरिटी फीचरने नेट बँकिंग करणार्‍या यूजर्सला खुप फायदा मिळेल.
ऑनलाइन फ्रॉड करणारे नेहमी तुमच्या अकाऊंटची काही माहिती जसे की,
अकाऊंट नंबर, यूजरनेम, पासवर्ड इत्यादी घेऊन एखाद्या दुसर्‍या डिव्हाइसवरून तुमच्या खात्यातून पैसे काढतात.
या सिक्युरिटी फीचरनंतर अशाप्रकारच्या फ्रॉडला लगाम लागेल.

Web Title :- sbi adds a new feature to yono lite app for secure online banking know details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच; पुन्हा एकदा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Sangli News | पुराबरोबर आलेली मगर पाणी ओसरल्यानंतरही घराच्या छतावरच अडकून राहिली

Maharashtra Unlock | राज्यातील 14 जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता, यादी मुख्यमंत्र्यांकडे सादर