SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, आज 3.25 वाजतापासून काम करणार नाही हे…आताच उरका महत्वाची कामे !

नवी दिल्ली : तुम्ही सुद्धा एसबीआय (स्टेट बँक ऑफ इंडिया) ग्राहक आहात तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. 4 एप्रिल म्हणजे आज ग्राहकांना डिजिटल ट्रांजक्शन करण्यात अडचण येऊ शकते. आज दुपारी सुमारे दोन तासापर्यंत एसबीआयचा इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म ठप्प राहील. बँकेने म्हटले की, आज साडेतीन तासांसाठी इंटरनेट बँकिंग, योनो अ‍ॅप आणि लाईट अ‍ॅपची सुविधा उपलब्ध राहणार नाही. बँक आपली सर्व्हिस अपग्रेड करत आहे, ज्यामुळे ही सर्व्हिस उपलब्ध नसेल.

बँकेने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बँकेने ट्विट करत लिहिले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांना विनंती करत आहोत की, आम्ही त्यांना आणखी चांगला बँकिंग अनुभव देण्यासाठी आमचा इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म अपग्रेड करत आहोत. असुविधेसाठी दिलगिर आहोत.

 

 

 

 

3.25 वाजतापासून राहील बंद
बँक 4 एप्रिलला 3.25 वाजतापासून 5.25 वाजेपर्यंत मेन्टनंसचे काम करेल. मेन्टनंस अ‍ॅक्टिव्हिटीमुळे ग्राहक दोन तासासाठी इंटरनेट बँकिंग, योनो अ‍ॅप, योनो लाइट आणि युपीआयचा वापर करू शकणार नाहीत. यासाठी जर तुम्हाला ऑनलाइन बँकिंगसंबंधी कोणतेही काम असेल तर त आताच उरकून घ्या.

एसबीआयचे देशभरात 44 कोटीपेक्षा जास्त ग्राहक आहेत. एसबीआयने डिजिटल ट्रांजक्शनमध्ये विक्रम केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या योनो अ‍ॅपचे मोठे योगदान आहे. आकड्यांनुसार योनोद्वारे बँकेने सुमारे 10 लाखपेक्षा जास्त पर्सनल लोन वितरित केले आहेत.