SBI Alert | बँकेनं दिला सतर्कतेचा इशारा; आजच करून घ्या ‘हे’ काम, अन्यथा लागेल 10 हजार रुपये दंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) हे नेहमीच आपल्या कोट्यावधी ग्राहकांना सतर्कतेच्या सूचना देत असते. ग्राहकांनी विविध बाबतीत दक्षता बाळगावी हा मुद्दा SBI चा असतो. समोर दिसणाऱ्या आणि भविष्यात येणाऱ्या अडचणींपासून बचाव करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) सर्व ग्राहकांनी पॅन कार्ड आणि Aadhaar card क्रमांकाशी लिंक करुन घेणे महत्वाचं असल्याचं म्हटलं आहे. याबाबत बँकेनं सूचना जारी केली आहे. ज्या ग्राहकांनी PAN आधारशी लिंक केला नाही त्यांनी लवकरच हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. विशेष 30 सप्टेंबर 2021 या मुदतीपर्यंत PAN ,आधारशी जोडणे आवश्यक आहे.

जर ग्राहकाला बँकेच्या सेवांचा कोणत्याही अडचणी व्यतिरिक्त लाभ घ्यायचा असेल तर PAN कार्ड आणि आधार कार्डशी जोडणे गरजेचं आहे. PAN आणि Aadhaar card लिंक केलं नाही तर नुकसानीची बाब म्हणजे अकाऊंट बंद होऊ शकते. त्यामुळे ग्राहकाला कोणताही बँकिंग व्यवहार करता येणार नाही. म्हणून येणाऱ्या 30 सप्टेंबरअगोदर PAN आधारशी जोडून घ्या अशी सूचना स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) दिली आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या क्काय नुकसान होऊ शकतं.

Jayant Patil | ‘मी फक्त शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडूनच बुके घेणार’; असं का म्हणाले जयंत पाटील, चर्चेला उधाण

SBI Alert customers link aadhaar pan before this date know steps to check

PAN card बॅड होऊ शकतं अथवा दंड द्यावा लागणार –

पॅनकार्ड आधारशी जोडले नाही तर पॅन कार्ड बाद होते. तसेच, 31 मार्च 2021 नंतर कोणतेही बाद झालेले पॅनकार्ड जर तुम्ही वापरले तर प्राप्तिकर कलम 272 B अंतर्गत 10 हजार रुपये दंड आकारला जातो. म्हणून जर करदात्यांनी 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर पॅनकार्ड बाद होऊ शकतं.अशी माहिती आयकर खात्यानं दिली आहे.

असं लिंक करा PAN card आधार कार्डशी –

> आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगिन करा.

> इथे तुम्हाला Aadhaar link करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

> त्यानंतर तुमचा PAN नंबर, Aadhaar क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.

> यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.

> सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.

दरम्यान, PAN card शी आधार कार्ड जोडण्याची प्रोसेस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येते. तर ग्राहक SMS च्या माध्यमातून PAN आणि Aadhaar देखील लिंक करू शकता. यामध्ये आपल्याला UIDPAN 12 अंकी आधार क्रमांक> <10 अंकी PAN> लिहून 567678 नंबरवर अथवा 56161 वर मेसेज पाठवावे लागणार आहे.

ऑफलाईन link कसं कराल?

PAN सेवा प्रदाता, NSDL या UTIITSLच्या सर्विस सेंटरवर जाऊन PAN आणि आधार लिंक केले जाऊ शकते. त्यासाठी ‘Annexure-I’ फॉर्म भरावा लागेल आणि PAN Card आणि आधार कार्डची प्रत सोबत घ्यावी लागणार आहे. ही प्रोसेस मोफत आहे. यामध्ये ग्राहकाला निश्चित फी भरावी लागेल. लिंक करताना PAN अथवा Aadhaar तपशिलात सुधारणा करण्यात आली की नाही यावर ही फी अवलंबून असू शकते.

हे देखील वाचा

Chandrapur Crime | व्हॉट्सअ‍ॅपवर ‘Bye bye’ स्टेटस ठेवत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  SBI Alert customers link aadhaar pan before this date know steps to check

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update