SBI कडून अलर्ट जारी ! ‘असा’ QR code स्कॅन केल्यास अकाउंट होईल रिकामे
नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन : भारत देश डिजीटायजेशनच्या दिशेने जात असताना नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग आणि गुगल पे यांसारख्या इतर अनेक ऑनलाईन पेमेंट माध्यमांचा वापर वाढला आहे. त्यामुळे विशेष खबरदारी न घेतल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. त्यानुसार, आता देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने आपल्या खातेदारांना एक ट्विट करून अलर्ट केले आहे.
https://twitter.com/TheOfficialSBI/status/1386954800302944256
एसबीआयने केलेल्या ट्विटमध्ये ग्राहकांना सावध राहण्याची सूचना केली आहे. कोणत्याही माध्यमातून पाठवण्यात आलेल्या QR कोड स्कॅन करू नका, असा सल्लाही दिला आहे. जर तुम्ही तसे केले तर तुमचे बँक अकाउंट रिकामे होऊ शकते. ऑनलाईन बँकिंगचा कोणत्याही धोक्याविना वापर करण्यासाठी बँकेने अलर्ट जारी केला आहे. अशा मेसेजपासून सावध राहण्याची सूचना बँकेकडून देण्यात आली आहे.
स्टेट बँकेने एक व्हिडिओ जारी करत म्हटले, की ‘ऑनलाईन फसवणूक करणारे ग्राहकांना डायनिंग टेबलच्या पेमेंटसाठी QR कोड पाठवतो. मात्र, ग्राहकांनी हे लक्षात ठेवावे की, QR Code नेहमी पेमेंट करण्यासाठी वापरला जातो. पेमेंट रिसिव्ह करण्यासाठी नाही. त्यामुळे या रिक्वेस्ट मानू नका. त्यामुळे सावध व्हा. QR Code च्या फ्रॉडपासून सावध राहण्याची सूचना बँकेकडून करण्यात आली आहे.
असे करा पेमेंट
जर QR Code च्या माध्यमातून पेमेंट करायचे असेल तर YoNo अॅपचा वापर करा. हे पूर्णपणे सुरक्षित आहे. तसेच खूपच सोपेही आहे.