SBI चा अलर्ट ! मोबाईल चार्ज करताना ‘ही’ काळजी घ्या, अन्यथा होईल बँक अकाऊंट ‘रिकामं’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जेव्हा आपल्या मोबाईल फोनची बॅटरी डिस्चार्ज होते तेव्हा आपण कोणताही चार्जिंग पॉईंट पकडतो आणि फोन चार्ज करतो. परंतु तुम्हाला याची कल्पना आहे का की, या चार्जिंग पॉईंटमुळे आपल्या फोनचा सर्व डेटा हॅकर्सपर्यंत पोहोचू शकतो. तसेच या डेटाच्या माध्यमातून हॅकर्स तुमचे बँक खातेही रिकामे करू शकतात. दरम्यान, भारतीय स्टेट बँक (एसबीआय)नं आपल्या ग्राहकांना को-चार्जिंग स्टेशनवर फोन चार्ज करताना सावधानता बाळगावी असं आवाहन केलं आहे.

एसबीआयची ट्विट द्वारे माहिती
बँकेने या संदर्भात एक ट्विट केलं आहे. बँकेनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “कोणत्याही चार्जिंग पॉईंटवर फोन चार्ज करण्यापूर्वी दोन वेळा विचार करा. कारण तेथील मालवेअरमुळे फोनला धोका निर्माण होऊ शकतो आणि फोनचा सर्व डेटा आणि पासवर्ड चोरीला जाऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणावरील चार्जिंग पॉईंटवर फोन चार्ज करताना तेथे एखादी चिप किंवा जादा वायर आहे किंवा नाही हे तपासून पहा. जर जादा वायर किंवा चिप असेल तर अशा चार्जिंग पॉईंटवर फोन चार्जिंग करणं टाळा. शक्यतो आपल्या फोनच्या चार्जिंग वायरनेच फोन चार्ज करा. त्यासाठी तुमच्या फोनची चार्जिंग केबल नेहमी सोबत असू द्या. यापेक्षा सोपा उपाय म्हणजे पॉवर बँक किंवा पोर्टेबल बॅटरीचा वापर करावा.

बँकेनं दिल्या ‘या’ सूचना
आपण ज्या सिस्टीमवरून ऑनलाईन बँकिंग करता त्या सिस्टीममध्ये नेहमीच नवीन अँटी व्हायरस ठेवायला हवं. अनेक प्रकारचे व्हायरस हल्ले लक्षात घेऊन नवीन अँटी-व्हायरस तयार केले जातात. आपला अँटी व्हायरस जितका मजबूत असेल तितकंच तुमची सिस्टम हॅक करणं अवघड असेल. ग्राहकांनी त्यांचा SBIonline बँकिंगचा पासवर्ड वेळोवेळी बदलायला हवा. त्यामुळे पासवर्ड लीक होण्याचे चांसेस कमी होतात.

Visit : Policenama.com