SBI नं दिला अलर्ट ! 15 दिवसांमध्ये ‘या’ ग्राहकांचं बंद होणार ATM debit डेबिट कार्ड, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : आपले जर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI ) मध्ये खाते असेल आणि आपण बँकचे एटीएम-डेबिट कार्ड वापरत असाल तर आपण सावध असणे आवश्यक आहे. कारण एसबीआय बँकेने केलेल्या ट्विटनुसार, ग्राहकांनी त्यांचे जुने चुंबकीय एटीएम-डेबिट कार्ड ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत बदलणे गरजेचे आहे. कारण नवीन वर्षापासून जुन्या एटीएम-डेबिट कार्डमधून पैसे काढू शकणार नाहीत. म्हणजेच, नवीन एटीएम-डेबिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याकडे केवळ १५ दिवस बाकी आहेत.

दरम्यान , एसबीआयने ट्विट केले आहे की, ज्या ग्राहकांकडे जुन्या चुंबकीय कार्ड आहेत त्यांना त्वरित बदलले जावे. त्याऐवजी ग्राहकांना ईव्हीएम चिप डेबिट कार्ड घ्यावे लागेल. याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०१९ आहे.

एटीएम-डेबिट कार्डांवर कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये आणि ते पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित करण्यासाठी एसबीआय बँक नवीन ईएमव्ही चिपसह एक कार्ड जारी करीत आहे. ही नवीन चिप एटीएम-डेबिट कार्ड आता कोणत्याही शुल्काशिवाय विनामूल्य केली जात आहेत.

हे कार्ड मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या शाखेत जाऊन अर्ज करावा लागेल. होम ब्रँच म्हणजे ज्या शाखेत तुमचे खाते आहे तेथे तुम्हाला नवीन एटीएम-डेबिट कार्डसाठी अर्ज करावा लागेल. आपण नेटबँकिंगचा वापर केल्यास आपण एटीएम-डेबिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/