‘कोरोना’च्या संकटा दरम्यानच SBI नं ग्राहकांना केलं सावध ! अकाऊंट होऊ शकतं रिकामं, दिल्या ‘या’ 7 टीप्स, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका बाजूला पूर्ण देश कोरोना व्हायरसशी लढत आहे. तर दुसरीकडे सायबर गुन्हेगार एक नवीन पद्धत वापरून लोकांना फसवणुकीचा शिकार बनवत आहेत. काही ठिकाणी कोरोना रिलीफ फंडसाठी डोनेशन मागितले जात आहे तर काही ठिकाणी कोरोनापासून बचावासाठी बनावट ऍपद्वारे लोकांची माहिती चोरली जात आहे. याप्रकारे या फसवणुकीपासून वाचण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने लोकांना सावधान केले आहे आणि त्यांना ऑनलाइन फसवणुकीपासून वाचण्यासाठी सात टिप्स दिल्या आहेत. जाणून घेऊया काय आहेत त्या टिप्स…

एसबीआयने ट्विट करत सांगितले की, जग एका घातक महामारीशी लढत आहे आणि सायबर गुन्हेगारांनी नवीन पद्धतीने लोकांना त्रास देणे सुरु केले आहे. सध्या तुम्ही सावधान आणि सतर्क राहा. एसबीआयने ग्राहकांना सायबर गुन्हेगारांपासून बचावासाठी सात सेफ्टी टिप्स दिल्या आहेत. या सेफ्टी टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या खात्याचे फसवणुकीपासून संरक्षण करू शकता.

या सेफ्टी टिप्स करा फॉलो –

१. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनच्या स्थितीत फसवणूक करणारे सक्रिय झाले आहेत आणि फसव्या युपीआय आयडीने डोनेशन मागत आहेत. बँकेने म्हटले, फसव्या युपीआय आयडीने डोनेशन मागणाऱ्यांपासून सावध राहा. आपल्या कष्टाच्या कमाईला डोनेट करण्याअगोदर विचार करा.

२. फंड देण्याअगोदर पैसे घेणाऱ्याची ओळख तपासा.

३. कोणत्याही ई-कॉमर्स साइटवर आपल्या कार्डची डिटेल कधीच सेव्ह करू नका.

४. अनावश्यक ईमेलवर आपली महत्वाची माहिती देऊ नका.

५. कोरोना व्हायरसशी संबंधित कोणत्याही बातमीवर क्लिक करण्याअगोदर तपासा.

६. विश्वसनीय स्रोतांकडून तथ्य सामायिक करा.

७. तुम्हाला घोटाळा दिसताच त्याचा रिपोर्ट करा.