एक क्लिक अन् अकाऊंट रिकामं, इशारा देत SBI म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना सावध केले आहे. बँकेने त्वरित कर्ज देणाऱ्या अ‍ॅप पासून सावध राहण्याची सूचना ग्राहकांना केली आहे. तसेच कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना त्वरित कर्ज देणाऱ्या अ‍ॅप पासून सावध राहण्यास सांगितले आहे. तसेच घाईघडबडीत कर्ज घेणे धोकादायक ठरू शकते असे म्हटले आहे. यातून वाचण्यासाठी बँकेने काही सुरक्षेच्या सूचनाही केल्या आहेत. अशा कोणत्याही अ‍ॅपचा वापर न करण्याच्या सूचनाही बँकेने केल्या आहेत.

अशा अ‍ॅपद्वारे कर्ज देण्याच्या बहाण्याने ग्राहकांची फसवणूक केली जाते. तसेच आपली वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नये असेही बँकेने म्हटले आहे. तसेच आपला एटीएम पिन, कार्ड नंबर, अकाऊंट नंबर आणि ओटीपी कोणासोबतही शेअर न करण्याचे आवाहन बँकेने केले आहे. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यापूर्वी नियम आणि अटी पूर्णपणे वाचल्या पाहिजेत.

तसेच कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. तसंच अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची सत्यताही पडताळून पाहावी. तसेच कोणत्याही आर्थिक मदतीसाठी https://bank.sbi यावर जाऊन मदत घेण्याचे आवाहनही बँकेने केले आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेकांसोबत असे प्रकार घडल्याची माहिती समोर आली होती. काही जणांना रक्कम फेडता आली नाही त्यावेळी त्यांच्याकडून धमकीचे फोनही आले होते. अशा प्रकारांपासून वाचण्यासाठी बँकेने सावध राहण्यास राहण्यास सांगितले आहे.