SBI ची कोटयावधी ग्राहकांसाठी खास सुविधा ! आता घरबसल्या घ्या ‘या’ 8 सेवांचा लाभ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील मोठी असणारी बँक भारतीय स्टेट बँक (SBI) ग्राहकांसाठी खास सुविधा देते. तर ग्राहकांनी बँकेत न जाता घरी बसून बँकेने दिलेल्या सेवांचा फायदा घेऊ शकतात, अनेक दिलेल्या सेवांमधून खातेदार आपल्या खात्यामधील शिल्लक राहिलेली रक्कम चेक करू शकते. आणि निधीही हस्तांतरित करू शकतात. तर नवीन चेकबुक, डेबिट कार्ड यासाठी अर्ज करू शकतात. या सुविधेव्यतिरिक्त ग्राहकांना SBI मध्ये इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून मुदत ठेव आणि आवर्ती ठेव खाते तयार करण्याची सुविधाही मिळणार आहे. SBI इंटरनेट बँकिंग सुविधा ग्राहकाला घरबसल्या सुरक्षित सुविधेबरोबर बँकिंग व्यवहार करण्यासाठी परवानगी देत आहे.

तर या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अर्थात इंटरनेट बँकिंग वापरण्यासाठी यूजरनेम आणि लॉग-इन पासवर्डची आवश्यकता असणार आहे. ग्राहक घरबसल्या इंटरनेट बँकिंगद्वारे आठ प्रकारची कामे करू शकतात. पैशांचे व्यवहार, ATM कार्डसाठी अर्ज, ठेवी खात्याशी संबंधित कामे, बिल पेमेंट, बचत खात्याचे स्टेटमेंट, चेक बुकसाठी अर्ज करणे, UPI सुरू करणे आणि बंद करणे, कर भरणे. अशा अनेक गोष्टीचे कामे करू शकता. असे SBI ने ट्विटद्वारे माहिती दिलीआहे. SBI च्या नेटबँकिंग सुविधेसाठी नोंदणी करू शकता. हे काम संपूर्णऑनलाइनद्वारे करता येणार आहे जाणून घ्या.

इंटरनेट बँकिंग कसे कराल सुरु?
> प्रथम SBI च्या नेट बँकिंग onlinesbi.com या होमपेजवर जाणे.
> New User Registration/Activation वर क्लिक करा.
> आवश्यक ती माहिती भरून, खाते नंबर, CIF नंबर, शाखा नंबर, देश, नोंदणी केलेला मोबाइल नंबर, Submit या बटणावर क्लिक करणे.
> ग्राहकाला मोबाईलवर OTP येईल.
> ATM card पर्याय निवडा आणि जर ग्राहकाकडे ATM card नसेल तर बँक पुढील प्रक्रिया पूर्ण करेल.
> तात्पुरते Username आणि Password तयार करा. (Password ८शब्दांचा वापर) डबल वेळा प्रविष्ट करा, नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी Submit बटणावर क्लिक करणे.
> तात्पुरत्या Username आणि Password सह पुन्हा लॉग इन करा.
>आपल्या आवडीचे Username तयार करा, जो तुम्हाला कायम वापरावा लागणार आहे.
> अटी आणि शर्ती स्वीकारल्यानंतर Login password आणि प्रोफाइल पासवर्ड सेट करा.
> जन्मतारीख, जन्म स्थान आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक नोंद करा.
> बँक खात्याची माहिती पाहण्यासाठी अकाउंट समरी या लिंकवर क्लिक करा.
> View only right नोंदणी केली असेल, तर ग्राहकाच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेच्या प्रिंटआउटसह Transcation right अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी ग्राहकाच्या शाखेशी संपर्क करू शकता.

Username, Password विसरल्यास?
> www.onlinesbi.com वर जाणे.
> Forgot login password या पर्यायावर क्लिक करा. यानंतर पुढील पानावरील Next वर क्लिक करा.
> आता तुमचे Username, खाते नंबर, देश, नोंदणीकृत मोबाइल नंबर, जन्मतारीख आणि SBI नेटबँकिंगचा कॅप्चा प्रविष्ट करा.
> तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो प्रविष्ट करा आणि कन्फर्म वर क्लिक करा.
> आता login password रिसेट करण्यासाठी ३ पर्याय दिसतील. ATM card तपशील, Profile password आणि ATM card
> आता प्रोफाइल पासवर्डशिवाय login password रिसेट करणे.