SBI Annuity Deposit Scheme | एसबीआयच्या ‘या’ स्कीममध्ये एकदा पैसे जमा केल्यानंतर दर महिना होईल कमाई
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI ची अॅन्युइटी डिपॉझिट स्कीम (SBI Annuity Deposit Scheme) ही बँकेच्या सर्वात महत्वाच्या ठेव योजनां (Deposit Schemes) पैकी एक आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना एकाच वेळी सर्व पैसे जमा करावे लागतील. काही महिन्यांनंतर बँक दरमहा हप्त्याच्या स्वरूपात ग्राहकांना पैसे देते. बँक हा हप्ता मुद्दलाचा व्याजदर (Rate of Interest) म्हणून मोजते. (SBI Annuity Deposit Scheme)
या योजनेत ग्राहकांना मिळणारे व्याज तीन महिन्यांच्या चक्रवाढ दरावर (Rate of Interest on Compounding) मोजले जाते.
या अॅन्युइटी डिपॉझिट स्कीम (Annuity Deposit Scheme) मध्ये गुंतवणुकीचा कालावधी बदलतो. तुम्ही या योजनेत 36 महिने, 60 महिने, 84 महिने आणि 120 महिन्यांसाठी गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे या योजनेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार जास्तीत जास्त गुंतवणूक करू शकता. या योजनेत किमान 1,000 रुपये गुंतवणे आवश्यक आहे.
18 वर्षांखालील लोकही करू शकतात गुंतवणूक
या योजनेसाठी खाते उघडल्यानंतर, ग्राहकाला युनिव्हर्सल पासबुक (Universal Passbook) मिळते. 18 वर्षांखालील लोकही या योजनेत गुंतवणूक करू शकतात. योजनेत, सिंगल (Single Account) किंवा जॉईंट अकाऊंट (Joint Account) उघडता येते. यामध्ये, गुंतवणुकीवरील व्याजदर निवडलेल्या कालावधीच्या मुदत ठेवीसाठी असतो. (SBI Annuity Deposit Scheme)
असे समजून घ्या गणित
समजा, जर तुम्ही पाच वर्षांसाठी फंड डिपॉझिट केला, तर तुम्हाला पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर लागू असलेल्या व्याजदरावर व्याज मिळेल. भारतातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. जर एखाद्या गुंतवणूकदाराला दरमहा 10000 रुपये मासिक उत्पन्न हवे असेल, तर त्यासाठी गुंतवणूकदाराला 5 लाख 7 हजार 965 रुपये आणि 93 पैसे जमा करावे लागतील.
तुम्हाला जमा केलेल्या रकमेवर 7 टक्के व्याज दराने रिटर्न मिळेल, ज्यामुळे गुंतवणूकदार दरमहा सुमारे 10 हजार रुपये कमावतील.
गुंतवणूक नियम
एसबीआयच्या अॅन्युइटी स्कीममध्ये दरमहा किमान 1000 रुपये जमा करण्याचा नियम आहे, परंतु जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. अॅन्युइटी पेमेंटमध्ये, ग्राहकाने जमा केलेल्या रकमेवर व्याज आकारून विहित वेळेनंतर उत्पन्न सुरू होते. ही योजना भविष्यासाठी खूप चांगली आहे, पण मध्यमवर्गीयांना इतके पैसे एकत्र जमणे शक्य नाही.
Annuity Scheme ची विशेष वैशिष्ट्ये
– तुम्ही एसबीआयच्या सर्व शाखांमधून Annuity Scheme मध्ये गुंतवणूक करू शकता.
– एसबीआय कर्मचारी आणि माजी कर्मचार्यांना एक टक्का अधिक व्याज मिळेल.
– ज्येष्ठ नागरिकांना 0.5 टक्के अधिक व्याज मिळेल.
– Term Deposit चे व्याजदर या योजनेवर लागू होतील.
– ठेवीनंतरच्या महिन्यापासून देय तारखेला अॅन्युइटी दिली जाईल.
– TDS कापल्यानंतर बचत खात्यात किंवा चालू खात्यात अॅन्युइटी भरली जाईल.
– एकरकमी रकमेवर चांगला रिटर्न मिळविण्यासाठी एक चांगली योजना आहे.
– विशेष स्थितीत अॅन्युइटीच्या शिल्लक रकमेच्या 75% पर्यंत ओव्हरड्राफ्ट/कर्ज मिळू शकते.
– बचत खात्यातून Annuity Scheme मध्ये चांगला रिटर्न मिळतो.
Web Title :- SBI Annuity Deposit Scheme | sbi annuity scheme benefits key features better option for good return know all the details
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक