SBI मध्ये 700 जागांसाठी भरती, ‘या’ उमेदवारांना संधी, अर्जासाठी कुठलीही फीस नाही, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना मोठी संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने यासाठी उमेदवारांची भरती सुरु केली आहे. पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिस पदावर हि भरती केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार तात्काळ याठिकाणी जाऊन अर्ज करू शकता.

पदसंख्या
अप्रेंटिस या पदासाठी जवळपास 700 जागा असून यासाठी हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

पात्रता
यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी असणे आवश्यक आहे.

वय
उमेदवाराचे वय हे कमीतकमी 20 वर्ष तर जास्तीत जास्त 28 वर्षांपर्यंत असावे. तसेच या पदांच्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

महत्वाच्या तारीख
अर्ज करण्याची तारीख – 17 सप्टेंबर 2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 ऑक्टोबर 2019

परीक्षेची तारीख- 23 ऑक्टोबर 2019

कशी होणार निवड
उमेदवारांची निवड हि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना sbi.co.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांना मासिक 8 हजार रुपये मिळतील.

Visit – policenama.com