SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर ! ‘या’ नवीन ATM कार्डमुळे तुमचे पैसे राहणार अधिक सुरक्षित

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – जसजसे जग डिजिटल होत चालले आहे, तसतसे ऑनलाईन घोटाळे होण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाईन चोरीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सायबर घोटाळ्यांना चालना मिळण्याची शक्यता निर्माण होते. एटीएम हॅक करण्याचे प्रमाण वाढले आहे. या सगळ्याचा विचार करून देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी नवीन एटीएम कार्ड आणले आहे. ज्यामुळे तुम्ही बिनधास्त व्यवहार करू शकता. एसबीआयने असे एटीएम कार्ड आणले आहे, जे कि तुम्ही कंट्रोल करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला हवे तेव्हा त्याला तुम्ही चालू किंवा बंद करू शकता.

एसबीआय हि सुविधा आपल्या ग्राहकांना एका ऍपच्या माध्यमातून देत आहे. एसबीआय क्विक नावाच्या या ऍपमध्ये कार्ड ब्लॉक करणे, चालू किंवा बंद करणे, कार्डचा पिन नंबर बदलणे यांसारख्या सुविधा देत आहे. म्हणजेच तुम्ही या ऍपच्या माध्यमातून तुमच्या कार्डच्या सुरक्षेसंबंधी सर्व प्रक्रिया पार पाडू शकता.

कसं वापरणार ऍप :
सर्वप्रथम तुम्ही ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.

अशाप्रकारे करा कार्ड ब्लॉक :
जर तुमचे एटीएम कार्ड गहाळ झाले किंवा हरवल्यास तुम्ही ऍपच्या डेबिट कार्डच्या विभागात एटीएम कार्ड ब्लॉकिंग वर क्लिक केल्यास तुम्ही त्यावर तुमच्या कार्डचे शेवटचे चार नंबर टाकल्यास तुमचे कार्ड बंद होऊ शकेल.

यादेखील सुविधा मिळणार :
एसबीआई क्विक मध्ये बैलेंस इन्‍क्‍वायरी, मिनी स्‍टेटमेंट, कार लोन-होम लोन ची माहिती, पीएम सोशल सिक्‍योरिटी स्‍कीम्‍स, अकाउंट डिरजिस्‍टर, अकाउंट स्‍टेटमेंट, होम लोन इंट्रेस्‍ट सर्टिफिकेट आणि एजुकेशन लोन सर्टिफिकेट ई-मेल च्या माध्यमातून आपण या ऍपद्वारे मिळवू शकता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like