video : खुशखबर ! आता ATM कार्ड शिवायही पैसे काढता येणार ; SBIने सांगितला ‘हा’ पर्याय

पोलिसनामा ऑनलाईन टीम : आपल्या ग्राहकांना सर्वात चांगली आणि अत्याधुनिक सेवा देण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक SBI सातत्याने प्रयत्नात असते. काही महिन्यांपुर्वीच एसबीआय ने एका नवीन सेवेस सुरुवात केली आहे. या सेवेमुळे आता ग्राहक ATM कार्ड शिवायही मशिनमधून पैसे काढू शकणार आहे. SBI ने यासंदर्भात एक व्हिडिओ ट्विटर वर शेअर केला आहे ज्याच्या माध्यमातून या सुविधेविषयी सविस्तर सांगितले आहे. जाऊन घेऊयात एटीएम कार्ड शिवाय कसे काढायचे पैसे.

एसबीआयचे अधिकृत YONO अ‍ॅप वर ‘योनो कॅश’ नावाने एक सुविधा दिली जाते. आपल्या फोन मध्ये हे YONO अ‍ॅप इन्स्टॉल असेल तर ‘योनो कॅश’ च्या साहाय्याने आपण एटीएम मधून कार्ड शिवायही पैसे काढू शकता.

कसा करावा या ‘अ‍ॅप’चा वापर:
– सर्वात आधी YONO अ‍ॅप उघडून ‘योनो कॅश’ सिलेक्ट करावे.
– त्यांनतर तुम्हाला जितक्या पैशांची गरज आहे तितकी रक्कम तेथे टाकावी.
– यानंतर ६ आकडी ट्रांजक्शन पिन निवडावा लागेल.या पिन चा वापर मशिनमधून पैसे काढताना होईल.
– यानंतर मोबाइल देखील एक मेसेज येयील ज्यामध्ये एक ट्रांजक्शन नंबर असेल.

मशीनमधून पैसे कसे काढावे :
– यानंतर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया च्या एटीएम वर जावे लागेल.
– एटीएम मशीन च्या स्‍क्रीन वर ‘योना कैश’ चा पर्याय निवडावा.
– त्यानंतर मोबाइल मेसेज च्या माध्यमातूजन मिळालेला ट्रांजक्शन नंबर तेथे टाकावा.
– नंतर काढावयाची रक्कम टाकून YONO अ‍ॅप वर तयार केलेला ६ आकडी ट्रांजक्शन पिन एंटर करावा.
– पिन टाकल्यानंतर हवी असणारी रक्कम तुम्हाला मशिनमधून मिळेल.

YONO अ‍ॅप च्या माध्यमातून तयार केलेल्या या ट्रांजक्शन पिन आणि ट्रांजक्शन नंबर केवळ एक तासासाठीच वैध असल्याने एका तासाच्या आत तुम्हाला मशीनमधून पैसे काढणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा हे नंबर्स तयार करावे लागतील.

आरोग्य विषयक वृत्त –

एक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो 

“केळी” आरोग्यासाठी उपयुक्त 

बाहेर जेवण करणे ठरू शकते मधुमेहाला निमंत्रण