SBI ATM New Rule | एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ! ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार OTP

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI ATM New Rule | भारतातील सर्वात मोठी असणारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) ग्राहकांसाठी एक महत्वाची माहिती आणली आहे. बँकेनं आपले एटीएम (SBI ATM) व्यवहार जादा सुरक्षित ठेवण्यासाठी एक मोठं पाऊल टाकलं आहे. ATM च्या माध्यमातून पैसे काढण्यासाठी एक नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. आता एसबीआयच्या एटीएममधून फक्त ओटीपीच्या (One Time Password) आधारे पैसे काढता येणार आहे. (SBI ATM New Rule)

 

एसबीआयचे ग्राहक एटीएममधून (SBI ATM New Rule) पैसे काढण्यासाठी जातील, त्यावेळी त्यांना आधी त्यांच्या मोबाईल फोनवर ओटीपी (OTP) येईल. हा ओटीपी टाकल्यानंतरच ग्राहक एटीएममधून पैसे काढू शकणार आहेत. यापुर्वी एटीएमवरुन पैसे काढण्यासाठी ओटीपीची आवश्यकता नव्हती मात्र, आता ओटीपीची आवश्यकता असणार आहे. म्हणजेच ओटीपीद्वारे पैसे काढता येणार आहे.

 

 

‘एसबीआय एटीएममधील (SBI ATM) व्यवहारांसाठी आमची ओटीपी आधारित कॅश विड्राल सिस्टम फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध एक लसीकरण आहे. तसेच, कोणत्याही प्रकारची फसवणूकीपासून तुमचे संरक्षण करणे ही आमची पहिली प्राथमिकता असेल, असं एसबीआयने सांगितलं आहे. तर, 10,000 किंवा त्याहून जादा रक्कम काढण्यासाठी हा नवीन नियम लागू केला आहे. अर्थात, जर एसबीआयच्या ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातून 10,000 रुपये अथवा त्याहून जादा रोख काढायचे असतील, तर त्यांना OTP आधारित पैस काढावे लागतील. (SBI ATM New Rule)

 

ओटीपी आधारित पैसे कसे काढाल?

– पैसे काढण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल.

– OTP हा 4 अंकी क्रमांक असेल जो ग्राहकाला पैसे काढताना टाकावा लागेल.

– त्यामुळे आता तुम्हाला एटीएममध्ये काढायची असलेली रक्कम टाकल्यावर तुम्हाला एटीएमच्या स्क्रीनवर OTP टाकण्यास सांगितले जाईल.

– तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर बँकेकडून OTP येईल.

– आता तुम्हाला रोख काढण्यासाठी या स्क्रीनवर बँकेने पाठवलेला OTP टाकावा लागेल.

– OTP टाकून एटीएममधून पैसे काढता येईल.

 

Web Title :- SBI ATM New Rule | sbi atm new rule-important news sbi customers now you have enter otp withdraw money atm

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ विशेष योजनेत पती-पत्नीला मिळतो 59,400 रुपयांचा फायदा, तुम्ही सुद्धा घ्या ‘लाभ’

BJP MLA Ashish Shelar | ‘महाराष्ट्रात ‘गब्बर’ सारखा कारभार सुरू, 34 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या घातला घशात’ – आशिष शेलार

Pune Crime | एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या सहाय्याने रक्कम दामदुप्पट करण्याच्या आमिषाने 34 लाखांची फसवणूक ! निलम केवट, प्रमोद चव्हाण आणि सचिन चव्हाण यांच्यावर FIR