देशातील सर्वात मोठ्या बँकेनं जारी केला ‘अलर्ट’, ATM कार्ड वापरताना करू नका ‘ही’ चूक, अन्यथा होऊ शकतं मोठं ‘नुकसान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेथे बँक आपल्या ग्राहकांना जागरूक करण्यासाठी आणि त्यांचे व्यवहार सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करीत असते. त्याच वेळी, ऑनलाईन फसवणूक करणारे ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी डेबिट/क्रेडिट कार्ड क्लोनिंग आणि सिम स्वॅप अशा अनेक पद्धती वापरत असतात. म्हणूनच, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ ने आपल्या ग्राहकांसाठी आवश्यक सुरक्षा सूचना दिल्या आहेत ज्या तुम्हाला एटीएम कार्ड वापरताना लक्षात ठेवल्या पाहिजेत.

एटीएम कार्ड वापरताना आपण काय लक्षात ठेवले पाहिजे त्याबाबत जाणून घेऊया…
1. एटीएम किंवा पीओएस मशीनवर एटीएम कार्ड वापरताना आपल्या हातांनी कीपॅड पुश करा.
2. कधीही पिन किंवा कार्ड तपशील शेअर करू नका.
3. आपल्या कार्डवर कधीही पिन लिहू नका.
4. कार्ड तपशील किंवा पिनसाठी विचारपूस करणाऱ्या टेक्स्ट मॅसेज, ई-मेल किंवा कॉलला प्रतिसाद देऊ नका.
5. आपल्या बर्थडे, फोन किंवा खाते क्रमांकाला आपल्या कार्डचा पिन म्हणून वापरू नका.
6. तुमच्या व्यवहाराच्या पावत्या काळजीपूर्वक ठेवा किंवा डिस्पोज करा.
7. ट्रान्झेक्शन सुरू करण्यापूर्वी गुप्त कॅमेऱ्यांना तपासा.
8. एटीएम किंवा पीओएस मशीन दरम्यान कीपॅडमधील छेडछाडकडे लक्ष घ्या.
9. हे लक्षात ठेवा की आपला फोन नंबर खात्याशी कनेक्ट केलेला असावा, जेणेकरुन ट्रान्झेक्शन अलर्ट्स प्राप्त होतील.

इन्स्टंट लोन अ‍ॅप्सपासून सावध रहा
याशिवाय त्वरित लोन देणाऱ्या अ‍ॅप्सपासून सावध राहण्यास बँकेने सांगितले आहे. याबाबत सल्ला देताना बँकेने आपल्या ग्राहकांना कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय स्वतःला एसबीआय किंवा इतर कोणत्याही बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगत माहिती मागणाऱ्या व्यक्तीला कोणतीही माहिती न देण्यास सांगितले आहे. यासह, त्वरित कर्जे देणारी अशी अ‍ॅप्स डाऊनलोड न करण्याचा सल्ला बँकेने दिला आहे. असे कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याबद्दल संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतरच ते इंस्टॉल करा, असे एसबीआयने म्हटले आहे.