SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी खुशखबर ! आता ‘मिनिमम’ बॅलन्स ठेवण्याची डोकेदुखी संपली, ‘या’ सुविधेवर ‘चार्ज’ पण नाही

नवी दिल्ली : वृत्तंसस्था – देशातील सर्वात मोठी आणि सार्वजनिक बँक असलेल्या SBI ने आपल्या खातेदारांना खुशखबर दिली आहे. बँकेने सर्व प्रकारच्या बचत खात्यावर किमान रक्कम (अ‍ॅव्हरेज मंथली बॅलन्स) ठेवण्याचा नियम रद्द केला आहे. आता ही किमान रक्कम ठेवणे अनिवार्य राहिलेले नाही. बँकेकडून प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले आहे. बँकेने ग्राहकांना समस्या मुक्त बँकिंग सेवा उपलब्ध करणे आणि देशातील वित्तिय समावेशनला प्रोस्ताहन देण्यासाठी पावले उचलली आहेत.

एसबीआयच्या या निर्णयामुळे 44.51 कोटी ग्राहकांना फायदा होईल. सध्या मेट्रो, सेमी अर्बन आणि रुरल परिसरात क्रमश 3 हजार, 2 हजार आणि 1 हजार रुपये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागत होता. जर ही मिनिमम रक्कम खात्यावर ठेवली नाही तर बँक ग्राहकांकडून दंड वसूल करत होती.

बँकांवरील ग्राहकांचा विश्वास वाढेल –
ही घोषणा करत एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार म्हणाले, या घोषणेने आपल्या मौल्यवान ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू येईल. किमान रक्कम माफ करणे बँकेचे एक महत्वाचे पाऊल आहे ज्याने ग्राहक अधिक सुविधाजनक आणि उत्तम बँकिंगचा अनुभव घेऊ शकतील. आम्हाला वाटते की या निर्णयामुळे ग्राहक एसबीआयशी जोडले जातील आणि त्यांचा एसबीआयवरील विश्वास देखील वाढेल.

SMS शुल्क माफ –
बँकेकडून सांगण्यात आले की पहिले ग्राहक, या उद्देशाने एसएमएस शुल्क देखील रद्द करण्यात आले आहे. या निर्णयाने बँकेच्या सर्व ग्राहकांना फायदा होईल. State Bank अ‍ॅसेट, डिपॉजिट, शाखा, ग्राहक आणि कर्मचारी यामध्ये देशातील सर्वात मोठी बँक आहे. 31 डिसेंबर 2019 साली बँकेचा डिपॉजिट बेस 31 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होता. बँकेने यापूर्वी MCLR बेस्ड व्याज दरात कपात करण्याची घोषणा केली होती. यासह बँकेने एफडीवरील व्याज दर कमी करण्याची देखील घोषणा केली होती.