ऑनलाइन एफडीबाबत SBI ने दिला इशारा ! सांगितले कशा प्रकारे सुरू आहे फसवणूक आणि कसा करावा बचाव, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जर तुम्हाला सुद्धा फिक्स डिपॉझिट (Fixed deposit) म्हणजे एफडीबाबत एखादा कॉल आला असेल तर हिच वेळ आहे अ‍ॅलर्ट होण्याची. विशेष करून एसबीआयच्या ग्राहकांनी. बँकेने आपल्या ग्राहकांना आणि सर्व जनतेला एफडीमध्ये गुंतवणुकीसाठी ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी इशारा दिला आहे. बँकेला ऑनलाइन फसवणुक झाल्याची तक्रार अनेक ग्राहकांकडून मिळाली आहे. सायबर गुन्हेगारांना रोखण्यासाठी बँकेने ग्राहकांना पासवर्ड/ओटीपी/सीव्हीव्ही कार्ड नंबर इत्यादी व्यक्तीगत डिटेल शेयर करण्यास मनाई केली आहे. बँकेने म्हटले की, बँक कधीही फोन, एसएमएस किंवा मेलवर या डिटेल्स विचारत नाही.

एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून म्हटले आहे.
की, त्यांना असा रिपोर्ट मिळाला आहे की, सायबर गुन्हेगारांकडून ग्राहकांच्या खात्यात ऑनलाईन एफडी (Fixed deposit) तयार केली जाण्याची माहिती मिळाली आहे.
आणि ग्राहकांसोबत फसवणूक केली जात आहे.

सायबर गुन्हेगारांच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीबाबत बँकेने म्हटले की, फसवणूक करणारे प्रथम आपल्या बँकिंग डिटेलसह ग्राहकांचे एफडी खाते बनवतात आणि काही रक्कम ट्रान्सफर करतात.
एसबीआयने म्हटले आहे की, फसवणूक करणारे स्वताला बँकेचे अधिकारी असल्याचे सांगून ग्राहकांकडून ओटीपी मागतात.
यानंतर ग्राहकाने जर ओटीपी शेयर केला तर एफडी रक्कम आपल्या खात्यात स्थानांतरित करतात.

Maratha Reservation : ‘…. तर परिणाम संपूर्ण राज्यभरात पहायला मिळतील’, विनायक मेटेंचा सरकारला इशारा (व्हिडीओ)

या पाच चुका करू नका

–  बँकेने म्हटले की, कधीही कुणासोबत आपल्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा ओटीपी, पिन, सीव्हीव्ही किंवा यूपीआय पिन शेयर करू नका.
फोन कॉल करून सर्वात जास्त फ्रॉड पासवर्ड चेंज करण्याच्या नावावर होतात.
फसवणूक करणारे ग्राहकांना सांगतात की, जर पासवर्ड चेंज केला नाही तर कार्ड ब्लॉक होऊ शकते, ज्यामुळे ग्राहक घाबरून त्यांना सर्व सांगतात.

–  कधीही आपल्या बँक खात्याची माहिती फोनमध्ये सेव्ह करू नका.
फोन चोरी झाल्यास फ्रॉड होऊ शकतो.

–  कोणत्याही व्यक्तीसोबत आपल्या एटीएम कार्डच्या डिटेल्स शेयर करू नका.

–  बँक अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी पब्लिक इंटरनेट, ओपन नेटवर्क आणि फ्री वाय-फाय झोनमधून ऑनलाइन ट्रान्जक्शन करू नका.
यामुळे इन्फॉर्मेशन लीक होऊ शकते आणि ऑनलाइन फ्रॉडची शक्यता वाढते.

–  कोणतीही बँक कधीही आपल्या कस्टमर्सकडून यूजर आयडी, पिन, पासवर्ड, सीव्हीव्ही, ओटीपी, व्हीपीए, यूपीआय इत्यादी माहिती मागत नाही.
जेव्हा कुणी व्यक्ती फोन किंवा इंटरनेटवर अशाप्रकारची माहिती मागतो तेव्हा समजा की तो फ्रॉड आहे, कोणतीही माहिती देऊ नका.