SBI अलर्ट ! ‘या’ लाखो खातेदारांनी 30 नोव्हेंबरपुर्वी ‘हा’ फाॅर्म बँकेत जमा करणं महत्वाचं, अन्यथा अडकतील खात्यात पैसे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI ने पेंशनधारकांना 30 नोव्हेंबरपर्यंत लाइफ सर्टिफिकेट (जिवंत असल्याचा दाखल) जमा करण्यास सांगितले आहे. म्हणजेच निवृत्त झालेले आणि ज्यांचे निवृत्ती वेतन (पेंशन) एसबीआयमध्ये जमा होते त्यांनी आपले लाइफ सर्टिफिकेट जमा करणं अत्यंत आवश्यक आहे. बँकेकडून सांगण्यात आले की पेंशनरला हे लाइफ सर्टिफिकेट 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत जमा करावे लागेल. देशात सर्वात जास्त पेंशन खाते SBI मध्ये आहेत. वेबसाइटनुसार एसबीआयमध्ये 36 लाख पेंशनरचे खाते आहेत तर 14 सेंट्रेलाइज्ड पेंशन प्रोसेसिंग रोल आहेत.

घर बसल्या जमा करा लाइफ सर्टिफिकेट :
बँकेने हे सर्टिफिकेट जमा करण्यासाठी खास सुविधेची घोषणा केली आहे. बँकेने ट्विट करत ही माहिती दिली. आता बँकेच्या कोणत्याही शाखेत हे लाइफ सर्टिफिकेट जमा केले जाऊ शकते. तसेच सरकारी अ‍ॅप ‘उमंग’च्या माध्यमातून बी सर्टिफिकेट घर बसल्या जमा करता येईल. याबरोबरच आधार सेंटर आणि कॉमन सर्विस सेंटरवर हे जमा करता येईल. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पेंशनरला आपल्या बँकेत जाऊन रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करुन आपण जिवंत असल्याचे प्रमाण द्यावे लागते. परंतू हे अनेकांसाठी शक्य नसते. अनेक पेंशनरचे वय जास्त झालेले असते, काही आजारी असतात, त्यांच्यासाठी बँकेकडून ही सोय करुन देण्यात आली आहे.

सर्टिफिकेट अपडेट करण्याची मॅन्युअल पद्धत :
स्टेट बँकेच्या आधिकृत वेबसाइटनुसार पेंशनरला बँक शाखेत जाऊन लाइफ सर्टिफिकेट जमा करावे लागेल. जर पेंशनर स्वत: जाऊ शकतं नसेल तर अधिकृत व्यक्ती बँकेत पाठवू शकतो, बँक अधिकारी लाइफ सर्टिफिकेटची पावती स्वीकारेल.

सेंट्रल पेंशन अकाऊंटिंग ऑफिसच्या मेमोरंडम नुसार जे पेंशनर बँकेत येऊ शकत नाहीत ते एखाद्या मॅजिस्ट्रेट किंवा गॅजेट ऑफिसरकडून साइन घेऊन आपले लाइफ सर्टिफिकेट जमा करु शकतात. जर बँकेत पेंशनर येऊ शकतं असेल तर बँक मॅनेजर त्यांनी सर्टिफाय करेल.

लाइफ सर्टिफिकेट जमा न केल्यास काय होईल :
असे न केल्यास ट्रेजरी तुमची पेंशन देणार नाही. यामुळे बँक आपल्या सर्व पेंशनर खातेदारांना नोव्हेंबरच्या आत लाइफ सर्टिफिकेट जमा करण्यास सांगते. जर सर्टिफिकेट जमा झाले नाही तर पेंशन आपल्या बँक खात्यातून पेंशन काढू शकणार नाही.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या