कोरोना काळात बँकेत जाण्याची आवश्यकता नाही, SBI सह अनेक मोठ्या बँका देताहेत ATM वर ‘या’ 5 सुविधा

नवी दिल्ली : बँक एटीएमचा अतापर्यंत केवळ कॅश काढण्यासाठी किंवा बँक अकाऊंटमधील बॅलन्स जाणून घेण्यासाठी तुम्ही वापर केला असेल, परंतु तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही एटीएममधून आणखी अनेक सेवांचा फायदा घेऊ शकता. आता एटीएमचे महत्व आणखी वाढले आहे. आता एटीएममध्ये जाऊन ग्राहक काही कामे अगदी काही मिनिटात पूर्ण करतील. डेबिट कार्डद्वारे तुम्ही एटीएममध्ये कोणती कामे करू शकता हे जाणून घेवूयात…

1. पॉलिसीचा हप्ता भरणे
एटीएमद्वारे आता इन्श्युरन्स पॉलिसीचा प्रीमियम सुद्धा भरता येईल. बँकांनी यासाठी एलआयसी, एचडीएफसी, आणि एसबीआय लाईफसारख्या विमा कंपन्यांशी करार केला आहे. या तीनही कंपन्यांचे ग्राहक एटीएममध्ये पैसे भरू शकतात.

एटीएम स्क्रीनवर बिल पे सेक्शनमध्ये जाऊन विमा कंपनीचे नाव सिलेक्ट करा, पॉलिसी नंबर टाका, यानंतर आपल्या डिटेल्स नोंदवा. प्रीमियमची रक्कम टाकून कन्फर्म करा. तुमचे इश्युरन्स पॉलिसीचे पेमेंट झाले आहे.

2. लोनसाठी एटीएममधून करा अप्लाय
एटीएममधून तुम्ही लोनसाठी अप्लाय करू शकता. आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँक एटीएममधून लोनसाठी अप्लाय करू शकता.

3. कॅश ट्रान्सफर
एटीएमच्या मदतीने आपल्या खात्यातून दुसर्‍याच्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते. दिवसात मल्टीपल ट्रांजक्शन करता येऊ शकतात.

4. कॅश डिपॉझिटची सुविधा
बँकेच्या सीडीएम मशीनद्वारे तुम्ही कॅश डिपॉझिट करू शकता.

5. बिल भरा
टेलीफोन, वीज, गॅस किंवा दुसरी अनेक बिले एटीएमद्वारे भरता येतात. यासाठी बँकेच्या वेबसाइटवरून जाऊन स्वताला रजिस्टर करावे लागेल.