SBI कडून 90 लाख ग्राहकांसाठी नवी सुविधा, आता विना पिन नंबर करा पेमेंट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI बँकेने बुधवारपासून मोबाइल पेमेंट करण्याची नवी सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहे. या नव्या सुविधेचे नाव आहे एसबीआय कार्ड पे (SBI Card Pay). या सेवेचे घोषणा बँकेकडून करण्यात आली. ही सुविधा प्वाइंट ऑफ सेल्स मशीनवर कार्डला स्पर्श न करता मोबाइल फोनच्या माध्यमातून पेमेंट देण्याची सुविधा आहे. यामुळे आता तुम्हाला सोबत क्रेडिट कार्ड बाळगण्याचे किंवा पिन टाकण्याचे टेन्शन राहणार नाही.

कंपनीच्या एका जाहिरातीत सांगण्यात आले की SBI कार्ड पे मध्ये ग्राहकांना नियर फील्ड कम्युनिकेशन (NFC) च्या माध्यमातून पीओएसवर पेमेंट करता येईल. त्यासाठी ग्राहकाला मोबाइलवर फक्त एक टॅब करावा लागेल आणि यासाठी पीओएसवर क्रेडिट कार्डला स्वाइप करण्याची किंवा हात लावून पिन दाबण्याची देखील आवश्यकता नाही. त्याशिवाय पेमेंट होऊ शकेल. हे पेमेंट एनएफसी प्रौद्योगिकीने परिपूर्ण अशा अद्यावत पीओएस मशीन करता येईल.

एका वेळी 2 हजार रुपयांपर्यंत करता येईल पेमेंट –
एसबीआय कार्डचे एमडी आणि सीईओ हरद्याल प्रसाद यांनी सांगितले की एसबीयआय कार्ड पे ग्राहकांच्या इच्छेनुसार प्रति ट्रांजेक्शन आणि डेली ट्रांजेक्शन लिमिट निश्चित करण्याची सूट देण्यात येईल. सध्या दुसरे एचसीई असलेले अ‍ॅप ग्राहकांना 2000 रुपयांपर्यंत प्रति ट्रांजेक्शन आणि प्रतिदिवशी 10 हजार रुपयांपर्यंतचे ट्रांजेक्शनची अनुमती देत आहेत.

कसे करता येईल वापर –
SBI Card Pay चा वापर करण्यासाठी कार्डधारकांना एसबीआय कार्ड मोबाइल अ‍ॅपवर आपली कार्ड नोंदणी करावी लागेल. कार्डची नोंदणी झाल्यावर ग्राहकांना पेमेंट करणे सोपे जाईल. फोनला अनलॉक करुन मोबाइलला प्वाइंट ऑफ सेलच्या जवळ नेऊन पेमेंट करता येईल. SBI कार्ड या सुविधेला VISA प्लॅटफॉर्मवर लॉन्च करण्यात आले आहे आणि हे कोणत्याही अ‍ॅण्ड्राइड फोनवर वापरता येईल ज्यात अ‍ॅण्ड्राइड किटकॅट वर्जन 4.4 आणि त्यापेक्षा अपडेट वर्जन असेल. एसबीआय कोर्डच्या ग्राहकांची संख्या जवळपास 90 लाख आणि जवळपास 17 टक्के मार्केट शेअर आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी